खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, सर्वच तुमचे, लोकांची सेवा कधी करणार? प्रविण दरेकरांचा शिवसेनेला सवाल

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचेच खासदार, पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते लोकांची सेवा कधी करणार? असा प्रश्न प्रविण दरेकरांनी उपस्थित केला (BJP Leader Pravin Darekar slams Shivsena).

खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, सर्वच तुमचे, लोकांची सेवा कधी करणार? प्रविण दरेकरांचा शिवसेनेला सवाल
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 7:37 PM

कल्याण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज (11 जुलै) कल्याण डोंबिवली शहराला भेट दिली. या दरम्यान त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला. कल्याण डोंबिवली शहराच्या विकासावर बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचेच खासदार, पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते लोकांची सेवा कधी करणार? असा प्रश्न प्रविण दरेकरांनी उपस्थित केला (BJP Leader Pravin Darekar slams Shivsena).

प्रविण दरेकर नेमकं काय म्हणाले?

“कल्याण डोंबिवलीत सत्ता शिवसेनेची आहे. शहराचा खासदार, शिवसेनेचा पालकमंत्री आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. तरीही आता जर विकास झाला नाही तर लोकांनी भरभरून मते दिली आहेत. त्यांची सेवा कधी करणार? विकासासाठी भाजपाचे सहकार्य कायम आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले (BJP Leader Pravin Darekar slams Shivsena).

केडीएमसी लसीकरणावर प्रतिक्रिया

“इतर ठिकाणी लस उपलब्ध होतात. इतर महापालिका 25 ते 30 हजार लस उपलब्ध करीत आहेत. त्या तुलनेत इथे लसीकरण अत्यल्प आहे. एकीकडे खाजगी लसीकरण सुरू आहे. तर नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेने लस खरेदी केली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.

‘रेल्वे सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्र्यांना भेटणार’

“सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरु व्हाव्यात यासाठी रेल्वे आंदोलन करावे लागले तर आंदोलन करु”, असं प्रविण दरेकर यावेळी म्हणाले. “हातावर पोट भरणारा कर्मचारी वर्ग कर्जत-कसारा ठाण्यापर्यंत राहतो. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्र्यांचीही भेट घेऊ”, असंदेखील ते म्हणाले.

हेही वाचा : मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी धरणावर, पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू, मृतदेहाचा शोध सुरु

भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.