KDMC Ward : केडीएमसीची प्रभाग रचना शिवसेनेच्या सोयीसाठी, मनसेनंतर भाजप आमदाराचे शिवसेनेवर टिकास्त्र

मनसे आमदार राजू पाटील यांनी ही प्रभाग रचना आधीच फुटली होती. शिवसेनेचे उमेदवारही ठरले आहेत असा गंभीर आरोप शिवसेनेवर केला आहे. आता या मुद्यावर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने पत्रकार परिषद घेत या प्रभाग रचनेसंदर्भात शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

KDMC Ward : केडीएमसीची प्रभाग रचना शिवसेनेच्या सोयीसाठी, मनसेनंतर भाजप आमदाराचे शिवसेनेवर टिकास्त्र
केडीएमसीची प्रभाग रचना शिवसेनेच्या सोयीसाठी, मनसेनंतर भाजप आमदाराचे शिवसेनेवर टिकास्त्र
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 5:33 PM

कल्याण : मनसे आमदार राजू पाटील यांच्यानंतर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसीच्या प्रभाग रचने(KDMC Ward Structure)वरुन शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ही प्रभाग रचना शिवसेनेच्या सोयीसाठी केली गेली आहे. आम्ही हरकती घेणार, पुढे काय करायचे ते पण आम्ही निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया भाजप आमदार रविंद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी दिली आहे. मात्र यांच्याकडे कोणता ही कामधंदा नाही. त्यांचा हाच अजेंडा आहे. काही चुकीचे असल्यास आम्हीही हरकत घेऊ. जे केले ते शिवसेनेने केले असे हे बोलत राहतात, असा पलटवार शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहिर झाली. 133 प्रभागात सदस्य 44 पॅनलमधून निवडणूक लढविणार आहेत. हरकतीसाठी 14 फेब्रुवारीर्पयत वेळ दिला गेला आहे. या प्रभाग रचना जाहिर होताच राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. (BJP MLA criticizes Shiv Sena over KDMC ward formation)

प्रभाग रचनेवरुन मनसेनंतर आता भाजपही आक्रमक

मनसे आमदार राजू पाटील यांनी ही प्रभाग रचना आधीच फुटली होती. शिवसेनेचे उमेदवारही ठरले आहेत असा गंभीर आरोप शिवसेनेवर केला आहे. आता या मुद्यावर भाजप आक्रमक झाली आहे. आता भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चैाधरी यांनी पत्रकार परिषद घेत या प्रभाग रचनेसंदर्भात शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या ठिकाणी प्रभाग वाढले पाहिजे. 27 गावात प्रभाग वाढले नाही. हे प्रभाग दुसऱ्या ठिकाणी वाढले. संपूर्ण प्रभाग रचना ही कायदेबाह्य आहे. नदी, रस्ते याचा कोणत्याही प्रकारचा विचार केला गेला नाही. ही प्रभाग रचना फक्त शिवसेनेची सोयीसाठी करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेसंदर्भात आम्ही हरकती घेऊ. पुढे काय करायचे हे देखील ठरवू असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा पलटवार

या बाबत शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी भाजप आणि मनसे या दोघांवर पलटवार केला आहे. त्यांच्याकडे काही कामधंदा नाही. यांचा हाच फक्त अजेंडा आहे. जे काही केले शिवसेनेने केले हे असे बोलत राहणार. प्रभाग रचनेत काही चूक असल्यास आम्हीही हरकत घेऊ असा पलटवार भोईर यांनी सांगितले. (BJP MLA criticizes Shiv Sena over KDMC ward formation)

इतर बातम्या

CCTV | कोंबड्या नेणाऱ्या टेम्पोची बाईकला समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुश करण्यासाठी शिवसेनेने सावरकरांचा फोटो लावला नाही, भाजपचा घणाघात

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.