मुलाच्या लग्नाच्या पैशात 2 हजार नागरिकांना कोरोना लस; भाजपा आ. गणपत गायकवाड यांचा आदर्श उपक्रम
देशभर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भीषण बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांनी मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचं ठरवलं होतं. या लग्नावरील खर्च नागरिकांच्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी वापरण्याचा निर्णय गायकवाडांनी घेतला होता.
ठाणे : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यामार्फत मोफत लसीकरणाला आजपासून सुरूवात झाली आहे. आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च टाळत नागरिकांचं कोरोना लसीकरण करण्याची घोषणा त्यांनी मे महिन्यात केली होती. त्यानुसार आजपासून या लसीकरणाला कल्याणमध्ये सुरूवात झाली आहे. या उपक्रमातून आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना संकटकाळात समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे. (BJP MLA from Kalyan East Ganpat Gaikwad has started vaccinating citizens against the cost of his son’s wedding)
मे महिन्यात केली होती घोषणा
देशभर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भीषण बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांनी मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचं ठरवलं होतं. या लग्नावरील खर्च नागरिकांच्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी वापरण्याचा निर्णय गायकवाडांनी घेतला होता. यासोबतच त्यांनी ऑक्सिजनचा प्लांट उभारण्यासाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणाा केली होती. इतकंच नाही तर नागरिकांचं लसीकरण झाल्यानंतर आपणही लस घेणार असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आजपासून या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे.
2 हजार नागरिकांना दिली जाणार मोफत लस
आजपासून सुरू झालेली आ. गायकवाड यांची लसीकरण मोहीम 3 दिवस चालणार आहे. यामध्ये परिसरातल्या 2 हजार नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, लॉण्ड्रीचालक यांना प्राधान्य दिले जाणार आहे. लसीकरण मोहीमेच्या शुभारंभाला आ. गणपत गायकवाड यांच्यासह भाजप शहराध्यक्ष संजय मोरे, मनोज राय, मोरेश्वर भोईर हे पदाधिकारी उपस्थित होते.
लसींअभावी लसीकरण केंद्र बंद
कल्याण-डोंबिवली महापालिकेत लस उपलब्ध नसल्याने अनेकदा सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली होती. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोनाची संख्या आटोक्यात असली तर मधल्या काळात कोरोनाचा मोठा फैलाव झाला होता. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड धावपळ सुरू होती. अशात लसींच्या पुरेशा पुरवठ्याअभावी नागरिकांचे प्रचंड हाल होत होते.
आ. गणपत गायकवाड झाले होते आक्रमक
लसींच्या पुरवठ्याअभावी अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांची तुफान गर्दी झाल्याचं चित्र काही दिवसांपूर्वी पाहायला मिळत होतं. उल्हासनगरच्या एका लसीकरण केंद्रावरही अशाचप्रकारची गर्दी जमली होती. विशेष म्हणजे लसीकरण केंद्रावर सकाळी चार वाजेपासून अनेक वयोवृद्ध नागरिक आलेले होते. त्यांना ऑफलाईन टोकण पद्धतीने लस दिली जाणार होती. मात्र, तिथे प्रशासनाचं नियोजनशून्य कारभार आढळल्याने कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड तेथील कर्मचाऱ्यांवर चांगलेच संतापले आणि त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांवर थेट शिवीगाळ केली. कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही तर त्यांना मारहाण करु, असा इशाराही त्यांनी दिला होता. BJP MLA from Kalyan East Ganpat Gaikwad has started vaccinating citizens against the cost of his son’s wedding)
संबंधित बातम्या :