Kalyan BJP MNS Protest : येडे बिडे समजले का तुमी, कल्याण पालिकेवर भाजप-एमएनएसचा ‘तहान मोर्चा’, राजू, पाटील, रवींद्र चव्हाण आक्रमक

Kalyan BJP MNS Protest : कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रचंड बिकट झाला आहे. या गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आज अखेर भाजप आणि मनसेने तहान मोर्चाचं आयोजन केलं होतं.

Kalyan BJP MNS Protest : येडे बिडे समजले का तुमी, कल्याण पालिकेवर भाजप-एमएनएसचा 'तहान मोर्चा', राजू, पाटील, रवींद्र चव्हाण आक्रमक
कल्याण पालिकेवर भाजप-एमएनएसचा 'तहान मोर्चा', राजू, पाटील, रवींद्र चव्हाण आक्रमकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 4:18 PM

निनाद करमरकर, कल्याण: कल्याण-डोंबिवलीतील (kdmc) 27 गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रचंड बिकट झाला आहे. या गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आज अखेर भाजप (bjp) आणि मनसेने (mns) ‘तहान’ मोर्चाचं आयोजन केलं होतं. भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते पहिल्यांदाच एकत्र येऊन महापालिकेवर धडक दिली. या मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता. मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच पहिल्यांदाच भाजप आणि मनसेचा एकत्र मोर्चा निघाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानिमित्ताने आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येण्याच्या जोरदार चर्चाही रंगल्या आहेत. भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यावेळी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना धारेवर धरले. रवींद्र चव्हाण यांनी तर पालिकेची अक्षरश: पिसे काढली.

भाजप आणि मनसेचे शेकडो कार्यकर्ते महापालिकेवर धडकले. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार राजू पाटील यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांशी बैठक झाली. या बैठकीत चव्हाण यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. मी काय बोलतो ते चांगल्या भाषेत ऐकायचं. पाणी देण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. तू तिथे मीटर लाव. आम्ही अडवलंय का तुला मीटर लावायला. मीटर लावायचं आणि त्याचं बिलिंग करायचं महापालिकेने. परवानगीची गरज नाही कुणाला. धोरणात्मक निर्णय आहे. एमआयडीसीने पाणी पुरवठा करायचा की नाही हा धोरणात्मक निर्णय आहे. पाठक सांगा त्यांना. नको तो शहाणपणा करायचा नाही. लहान मुलांसारखा कोणत्यातरी शाखाप्रमुखांनी सांगितलं म्हणून करायचं. त्या दिवशी बोललो होतो ना. परवानगीची काय गरज होती. वेडेबिडे समजता का काय आम्हाला?, असा संतप्त सवालच रवींद्र चव्हाण यांनी अतिरिक्त आयुक्तांना केला.

प्रशासनामुळे दिरंगाई

या बैठकीनंतर राजू पाटील आणि रवींद्र चव्हण यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. केडीएमसीतील 27 गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. प्रशाासनाच्या दिरंगाईमुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे. एमआयडीसी आणि केडीएमसी याची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाण्यासाठी राजकारण न करता सर्व नागरिक या मोर्चात सामील झाले आहेत, असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. मनसे-भाजपच्या युतीबाबत विचारलं असता लोकहितासाठी लोकांच्या समस्येसाठी लोक प्रतिनिधींनी एकत्र येणं चूक नाही. या गावांसाठी आम्ही लोकप्रतिनिधी एकत्र राहिलो आहोत. युतीसंदर्भात वरिष्ठ मंडळी निर्णय घेतील. पण आज प्रशासनाच्या दिरंगामुळे समस्या निर्माण झाली आहे. हे प्रशासन अतिशय निष्काळजी आहे. अनेक योजना पाच वर्षापासून प्रलंबित आहेत. अधिकारी पाट्या टाकण्याचं काम करत आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं.

ते वरिष्ठ ठरवतील

पाणी प्रश्नावर अनेक वेळा प्रशासनाबरोबर मिटिंग लावल्या. त्यांना लक्ष द्यायला आवाहन केलं होतं. मी रवींद्र चव्हाणांशी बोललो आणि मोर्चा काढला, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं. पाटील यांनीही भाजप-मनसे युतीबाबत बोलण्यास नकार दिला. राज्याचं माहीत नाही. पण पाणी प्रश्नावर एकत्र आहोत. केडीएमसीत एकत्र येणार की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील, असं पाटील यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray : राज ठाकरेंना केंद्राची सुरक्षा? हालचाली सुरू; राज यांचे महत्त्व वाढवण्याचे प्रयत्न?

Maharashtra News Live Update : महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीचे सूर, आता कोण नाराज?

Raj Thackeray | तो येईल भाषण करून जाईल, थोडं एंटरटेनमेंट होईल… राज ठाकरेंच्या सभेचा प्रश्न सुप्रिया सुळेंनी पुन्हा उडवून लावला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.