KDMC: कल्याण-डोंबिवलीत लसीकरणाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेना आमने-सामने
कल्याण डोंबिवलीत कोरोना लसीकरणाची मोहिम मंद गतीने राबविली जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. लसीकरण मंद गतीने सुरु असल्याने त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. लसीकरण मोहिम गतीमान करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.
कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना आमदारांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. लसीची भरसाठ पुरवठा असून लसीकरण मंद गतीने होत असल्याचा आरोप भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. लसीकरण योग्य प्रकारे सुरु आहे. ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे बोलत असतो असा पलटवार शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केला आहे.
प्रत्येक शाळेत जाऊन लसीकरण करावे, भाजप आमदाराची मागणी
कल्याण डोंबिवलीत कोरोना लसीकरणाची मोहिम मंद गतीने राबविली जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. लसीकरण मंद गतीने सुरु असल्याने त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. लसीकरण मोहिम गतीमान करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे. पहिला डोस दिला जात असला तरी दुसरा डोसही देण्याची व्यवस्था केली जावी. केंद्र सरकारकडून पुरेसा लस साठा उपलब्ध होत आहे.
केंद्राच्या हर घर दस्तक मोहिमे अंतर्गत लसीकरण केले पाहिजे. हे लसीकरण होताना दिसून येत नाही. तसेच 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करणे सुरु केले असले तरी त्याचाही वेग मंद आहे. प्रत्येक शाळेत जाऊन लसीकरण केले जावे. त्याचबरोबर पलावा ही टाऊनशीप आहे. या टाऊनशीपमधील नागरिकांना दुहेरी पद्धतीने मालमत्ता कर आकारला जात आहे. त्यांना करात सवलत द्यावी. योग्य प्रकारे कर लावला जावा अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.
लसीकरण योग्य पद्धतीने सुरु असल्याचा शिवसेना आमदाराचा दावा
भाजप आमदार रवींद्र चव्हाण आयुक्तांना भेटले. त्यानंतर कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यादरम्यान भोईर यांनी लसीकरण संदर्भात आयुक्तांकडून आढावा घेतला. आमदार विश्वनाथ भोईर यांचे म्हणणे आहे की आयुक्तांनी त्यांना सांगितले आहे, लसीकरण चांगल्या आणि योग्य प्रकारे सुरू आहे. लसीकरण शंभर टक्के करण्यासाठी गरज असेल तर लसीकरण केंद्र आणि मनुष्यबळ सुद्धा वाढवा अशी सूचना आमदार भोईर यांनी आयुक्तांना केली आहे. आयुक्तांनी भोईर यांची सूचना मान्य केली आहे.
भाजप आमदारांच्या आरोप संदर्भात शिवसेना आमदार भोईर यांना विचारणा झाली तेव्हा त्यांनी सांगितले की कोणी ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे बोलत असतो. केडीएमसीत लसीकरण योग्य पद्धतीने सुरू आहे गरज वाटली तर लसीकरण केंद्र वाढवण्यात येईल मात्र लसीकरणाच्या मुद्द्यावर काहीना भाजप-शिवसेना परत एकदा आमने सामने येताना दिसत आहेत. (BJP-Shiv Sena clash over Kalyan-Dombivali vaccination issue)
इतर बातम्या
KDMC Election | केडीएमसी प्रभागांचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करणार, यावेळी 11 प्रभागांची भर