Kalyan : नगरसेवकांवरील गुन्ह्याप्रकरणी भाजप शिवसेनेचे परस्परांविरोधात आरोप प्रत्यारोप
नगरसेवकांनी समाजात कसे राहिले पाहिजे हे त्या नगरसेवकांना शिकविले पाहिजे. पोलिसांच्या माध्यमातून एकाही नगरसेवकाला शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे भाजपने आधी सिद्ध करावे. खोटे आरोप करु नयेत. अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असे प्रतिउत्तर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिले आहे.
कल्याण : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत राजकारण सुरु झाले आहे. भाजप(BJP) आणि भाजपला समर्थन देणाऱ्या नगरसेवकांवर दबाव टाकण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. याप्रकरणी महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारच्या विरोधात भाजपकडून दोन आमदारांच्या नेतृत्वात अप्पर पोलिस आयुक्त कार्यालयावर शनिवारी विशाल मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माहिती दिली आहे. मात्र या नगरसेवकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. या नगरसेवकांची बाजू घेऊ नका. शिवसेना जशास तसे उत्तर देणार असा इशारा शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिला आहे. (BJP Shiv Sena’s rebuttal of allegations against each other in the case of crime against corporators)
भाजपच्या तीन माजी नगरसेवकांवर गुन्हे दाखल आहेत
कल्याण डोंबिवली महापालिकेतील माजी भाजप नगरसेवक सचिन खेमा यांना खंडणी आणि प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. सध्या सचिन खेमा हे न्यायालयीन कोठडीत आहेत. या पूर्वी भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांना एका हल्ला प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी भाजपला समर्थन देणाऱ्या माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या विरोधातही मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या सर्व प्रकरणावर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पत्रकार परीषद घेऊन पोलीस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्ला बोल केला आहे.
भाजपच्या नगरसेवकांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप
नरेंद्र पवार यांचे म्हणणे आहे की, महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून भाजपच्या नगरसेवकांना नाहक त्रास देत असून खोटे गुन्हे दाखल करीत आहे. भाजप नगरसेवक सचिन खेमा, मनोज राय आणि भाजपला समर्थन देणारे कुणाल पाटील यांच्या विरेाधात खोटे आरोप करुन गुन्हे दाखल केले. या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी महाविकास आघाडी दबाव टाकत आहे. याच्या निषेधार्थ शनिवारी अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयावर भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी भाजप मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे भाजपने सांगितले आहे.
…तर शिवसेनेकडून जशास तसे उत्तर देण्यात येईल
भाजपच्या या आरोपावर शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. ज्या नगरसेवकांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. ते सर्व गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहे. खंडणी विनयभंग प्राणघातक हल्ला या प्रकारचे गुन्हे नगरसेवकांच्या विरोधात आहे. नगरसेवकांनी समाजात कसे राहिले पाहिजे हे त्या नगरसेवकांना शिकविले पाहिजे. पोलिसांच्या माध्यमातून एकाही नगरसेवकाला शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे भाजपने आधी सिद्ध करावे. खोटे आरोप करु नयेत. अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असे प्रतिउत्तर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिले आहे. (BJP Shiv Sena’s rebuttal of allegations against each other in the case of crime against corporators)
इतर बातम्या