Kalyan BJP : कल्याणमध्ये शिवसेना खासदाराकडून भाजपला दे धक्का सुरुच, चौथा माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर आहे. निवडणुकीची पहिली स्टेज म्हणजे प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे. आता निवडणुकीच्या दिशेने केडीएमसीची तयारी सुरु झालेली आहे. ही तयारी सुरु असताना राजकीय पक्षांची तयारी सुद्धा जोरात आहे. प्रारुप आराखड्यावरुन भाजप आणि मनसेने शिवसेनेवर हल्ला बोल केला होता.
कल्याण : केडीएमसी निडणुकी (KDMC Election)च्या तोंडावर भाजपला शिवसेना खासदारांकडून दे धक्का सुरुच आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाजप माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशाल पावशेसह आतापर्यंत भाजपचे चार मोठे नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. याचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना दिले जात आहे. आगामी काळात भाजपचे आणखीन नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मात्र हे सर्व होत असताना कल्याण डोंबिवलीतील भाजपचे मोठे नेते असून या नगरसेवकांना थांबविण्याचा प्रयत्न का केला जात नाही हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री आणि खासदारांच्या उपस्थित भाजपचे तीन मोठे नगरसेवक महेश पाटील, सुनिता पाटील, सायली विचारे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला होता. (BJP’s fourth former corporator joins Shiv Sena in Kalyan on the backdrop of upcoming elections)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी सुरु
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर आहे. निवडणुकीची पहिली स्टेज म्हणजे प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे. आता निवडणुकीच्या दिशेने केडीएमसीची तयारी सुरु झालेली आहे. ही तयारी सुरु असताना राजकीय पक्षांची तयारी सुद्धा जोरात आहे. प्रारुप आराखड्यावरुन भाजप आणि मनसेने शिवसेनेवर हल्ला बोल केला होता. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज वाढदिवसानिमित्त ठाण्यातील कार्यक्रमात विशाल पावशे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
विशाल पावशे यांची राजकीय सुरुवात राष्ट्रवादीतून झाली होती. ते राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना कल्याण पूर्व विधानसभा निवडणूकीत उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना 25 हजारा पेक्षा जास्त मते पडली होती. त्यांना मिळालेली मते ही थोडी थोडकी नव्हती. 2015 सालच्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते भाजपतर्फे नगरसेवक पदी निडून आले. मात्र 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमधून बंडखोरी करीत शिवसेना बंडखोर उमेदवाराला मदत केली. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आणखीन काही नगरसेवक खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे संकेत वारंवार दिले जात आहेत. ते सुद्धा शिवसेनेच्या वाटेवर आहे. काही दिवसात भाजपला आणखीन मोठा धक्का शिवसेनेकडून दिला जाणार आहे. (BJP’s fourth former corporator joins Shiv Sena in Kalyan on the backdrop of upcoming elections)
इतर बातम्या
Ulhas River : अखेर उल्हास नदी जलपर्णीमुक्त झाली, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून पाहणी