भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला सोमवारपासून सुरुवात; ठाण्यातील आनंदनगर चेक नाका येथून शुभारंभ!

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला उद्या सोमवारपासून सुरूवात होणार आहे. सोमवार 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरू राहील. (BJP's 'Jan Ashirwad Yatra' will start from tomorrow in maharashtra)

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला सोमवारपासून सुरुवात; ठाण्यातील आनंदनगर चेक नाका येथून शुभारंभ!
political leader
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 7:28 PM

ठाणे: भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला उद्या सोमवारपासून सुरूवात होणार आहे. सोमवार 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरू राहील. उद्या सकाळी 10 वाजता ठाण्याच्या आनंदनगर चेक नाका येथे या जन आशीर्वाद यात्रेला हिरवा कंदिल देण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. (BJP’s ‘Jan Ashirwad Yatra’ will start from tomorrow in maharashtra)

या यात्रेत भाजपचे जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेतेही सहभागी होत असल्याने संपूर्ण वातावरण भाजपामय होणार आहे. या यात्रेद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच विविध योजनांचा आढावाही घेतला जाणार असून शेतकरी, भूमिपुत्र, मच्छिमार, दिव्यांग व लाभार्थी, व्यावसायिक व व्यापारी यांच्याशीही संवाद साधला जाणार आहे. भाजपचे समर्थ बुथ अभियान, स्वच्छता अभियान आदी विविध कार्यक्रम या यात्रेच्या निमित्ताने होणार असून त्या त्या जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते हे या यात्रेत सहभागी होणार आहेत. अशी माहिती यात्रेचे प्रमुख आमदार संजय केळकर यांनी दिली. या जनयात्रेची जय्यत तयारी झाली असून भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेच्या नियोजनाबाबत विविध बैठका झाल्या आहेत. या यात्रेचे नियोजनही झाले असून जास्तीत जास्त समाजघटकांना या यात्रेत जोडून घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

कपिल पाटलांचा झंझावात

ठाणे जिल्ह्यातून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपदी आगरी समाजातील खासदार कपिल पाटील यांची वर्णी लागली आहे. तसेच केंद्रात प्रथमच ओबीसी समाजाला 27 मंत्रीपदे मिळाली आहेत. सर्व समाजाला प्राधान्य देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. प्रथम केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेस ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाक्याहून 16 ऑगस्ट रोजी सुरूवात होणार आहे. 5 व्या दिवशी 20 ऑगस्टला भिवंडी तालुक्यात त्यांच्या यात्रेची सांगता होईल. या दरम्यान कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, अलिबाग, रेवदंडा, पेन, पनवेल, उरण, नवी मुंबई, कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, किनवली, शहापूर आदी विविध भागातून यात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

कुणाची यात्रा कधी?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची 7 दिवस यात्रा होणार आहे. एकूण 170 हून अधिक भागांना राणे भेट देणार आहेत. मुंबई व कोकण भागात त्यांची जन आशीर्वाद यात्रा होणार आहे. राणे यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रमोद जठार व सहप्रमुख म्हणून आमदार सुनिल राणे काम पाहणार आहेत. डॉ. भागवत कराड हे 6 दिवसाच्या यात्रेत 623 किमी प्रवास करणार आहेत. ते 155 भागांमधून फिरणार आहेत. यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रमोद पांगारकर काम पाहणार आहेत. डॉ. भारती पवार या 6 दिवसात 421 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. त्या जवळजवळ 121 भागांना भेट देणार आहेत. त्यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रा. अशोक उईके आणि सहप्रमुख म्हणून हरिश्चंद्र भोये व यात्रा प्रभारी म्हणून किशोर काळकर काम पाहणार आहेत. (BJP’s ‘Jan Ashirwad Yatra’ will start from tomorrow in maharashtra)

संबंधित बातम्या:

भाजपचं मिशन ‘जन आशीर्वाद’, चार केंद्रीय मंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार; आघाडीला शह देण्याची तयारी?

मुंबई ते कोकण, नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा ठरली, राज्य सरकारचे वाभाडे काढणार!

राहुल गांधींसाठी राष्ट्रवादीची बॅटींग, थेट ट्वीटर इंडियाला घेरलं; विचारला कळीचा प्रश्न

(BJP’s ‘Jan Ashirwad Yatra’ will start from tomorrow in maharashtra)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.