कल्याण पंचायत समितीत भाजपाच्या रेश्मा भोईर यांची सभापती पदी बिनविरोध निवड

शिवसेनेच्या अनिता वाकचौरे या मागील 17 महिने शिवसेनच्या सभापती होत्या. त्यांचा कार्यकाळ संपल्याने उर्वरित 8 महिन्यासाठी सभापतीपदाची निवडणूक घोषित केली. त्यांनंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाने एकमताने भाजपच्या गळ्यात सभापती पदाची माळ घातली असून भाजपच्या सदस्या रेश्मा भोईर यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

कल्याण पंचायत समितीत भाजपाच्या रेश्मा भोईर यांची सभापती पदी बिनविरोध निवड
भाजपाच्या रेश्मा भोईर यांची सभापती पदी बिनविरोध निवडImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 10:04 PM

कल्याण : एकीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमधील वाद विकोपाला गेले आहेत. असे असताना कल्याण पंचायत समितीमध्ये मात्र शिवसेना राष्ट्रवादी भाजप एकत्रितरित्या सत्तेचा आस्वाद घेत असल्याचे चित्र आहे. पंचायत समिती (Panchayat Samiti)च्या निवडणुकीनंतर सभापती (Chairperson) पदाची निवडणूक बिनविरोध करत शिवसेना राष्ट्रवादी भाजप या तिन्ही पक्षांनी सभापती पदाचा आस्वाद घेतला आहे. आज बिनविरोध निवड झालेल्या भाजपच्या सभापती रेश्मा भोईर यांनी सर्व पक्षीय सदस्याच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. (BJP’s Reshma Bhoir elected as chairperson of Kalyan Panchayat Samiti)

शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे पंचायत समितीत वर्चस्व

कल्याण पंचायत समितीत 5 भाजपा, 3 राष्ट्रवादी आणि 4 शिवसेना असे पक्षीय बलाबल आहे. पक्षीय बलाबलनुसार शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे पंचायत समितीत वर्चस्व आहे. मात्र कल्याण पंचायत समितीचे सभापती पद शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी उपभोगलं आहे. सभापती पद सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीकडे होतं त्यांनंतर शिवसेना भाजपचे उमेदवार देखील सभापती पदी विराजमान झाले.

अनिता वाकचौरेचा कार्यकाळ संपल्याने सभापती पदासाठी निवडणूक

शिवसेनेच्या अनिता वाकचौरे या मागील 17 महिने शिवसेनच्या सभापती होत्या. त्यांचा कार्यकाळ संपल्याने उर्वरित 8 महिन्यासाठी सभापतीपदाची निवडणूक घोषित केली. त्यांनंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाने एकमताने भाजपच्या गळ्यात सभापती पदाची माळ घातली असून भाजपच्या सदस्या रेश्मा भोईर यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. आज रेश्मा यांनी पंचायत समिती सदस्याच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. (BJP’s Reshma Bhoir elected as chairperson of Kalyan Panchayat Samiti)

इतर बातम्या

स्वतःचीच आरती स्वतःच ओवाळून घेतली, Anil Bonde यांचा शरद पवार यांच्यावर घणाघात

कल्याण रेल्वे स्थानकात चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुबाडले, रेल्वे पोलिसांची कारवाई

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....