रस्त्याच्या उतारावरच टँकरचा ब्रेक फेल झाला, पण दैव बलवत्तर म्हणून…
नेहमीप्रमाणे रस्त्याच्या दुभाजकांमधील झाडांना पाणी देण्याचे काम सुरु होते. मात्र पाणी देण्यासाठी आलेल्या टँकरचा रस्त्याच्या उतारावर ब्रेक फेल झाला.
कल्याण / सुनील जाधव : रस्त्यावरील झाडांना पाणी देण्यासाठी नेहमीप्रमाणे पाण्याचा टँकर आला होता. मात्र रस्त्यावरील उतारावर टँकरचा ब्रेक फेल झाला. चालकाच्या ही बाब लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टँकर दुभाजकावर चढवला. यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. पण चालकाच्या प्रसंगावधनामुळे पुढील वित्तहानी आणि जीवितहानी टळली. कल्याण पूर्वेतील काटे मानवली परिसरात पुणा लिंकरोडवर ही घटना घडली. मात्र चालकाने योग्य वेळी सावधगिरी बाळगत योग्य निर्णय घेतल्याने पुढील दुर्घटना टळली.
झाडांना पाणी घालण्यासाठी आलेल्या टँकरचे ब्रेक फेल झाले
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे शहर सुशोभीकरणांतर्गत रस्त्याच्या दुभाजकांमध्ये शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांना दररोज टँकर किंवा टेम्पोच्या माध्यमातून पाणी टाकण्याचे काम केले जाते. त्यानुसार नेहमीप्रमाणे आज सकाळी कल्याण पूर्वेतील काटे मानवली परिसरात असणाऱ्या पुणा लिंक रोडवर लिंक रोडवरील दुभाजकांमधील झाडांना पाणी घालण्याचे काम सुरू होते. सदर पाण्याने भरलेला टँकर आला असता ड प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरील उतारावर येताच टँकरचे ब्रेक झाले.
टँकरचे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. मात्र चालकाने घाबरुन न जाता प्रसंगावधान राखत टँकर डिव्हायडरवर चढवला आणि पुढची मोठी दुर्घटना टाळली. टँकरचा चालकही सुखरुप बचावला आहे.
शिर्डी-नाशिक महामार्गावर रस्त्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यात ट्रक पलटी
शिर्डी-नाशिक महामार्गावर सावळीविहीर फाट्यानजीक ट्रक चालकाला महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या खड्डयाचा अंदाज न आल्याने ट्रक खड्ड्यात पलटी झाला. हा ट्रक बडोद्याहून चेन्नईकडे चालला होता. या ट्रकच्या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून चालकही बालंबाल बचावलाय.