Ulhasnagar Fraud : चंद्रावर जमीन घेणाऱ्यानं 770 स्क्वेअर फूट जागा लाटली? उल्हासनगरच्या राम वाधवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा

राम वाधवा यांच्यासह अन्य दोघांवर जमीन लाटून परस्पर विकल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगरातील कापड व्यापारी परमानंद माखिजा यांची उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील ओटी सेक्शनमध्ये 770 स्क्वेअर फूट जागा होती. ही जागा 2019 साली बनावट कागदपत्रांच्या आधारे राजेश तलरेजा यांना विकण्यात आली.

Ulhasnagar Fraud : चंद्रावर जमीन घेणाऱ्यानं 770 स्क्वेअर फूट जागा लाटली? उल्हासनगरच्या राम वाधवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 8:48 PM

उल्हासनगर : चक्क चंद्रावर जागा घेणाऱ्या उल्हासनगरच्या व्यापाऱ्यावर आता पृथ्वीवरची 770 स्क्वेअर फूट जागा लाटून परस्पर विकल्याप्रकरणी फसवणुकी (Fraud)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम वाधवा (Ram Wadhwa) असं या व्यापाऱ्यांचं नाव असून त्यांनी 2020 साली चंद्रावर जागा घेतल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, वाधवा यांनी हा गुन्हा राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी फिर्यादी परमानंद माखिजा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी आयपीसी 420, 465, 468, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यात आरोपी म्हणून भरत रोहरा, अजीज अमीर शेख आणि राम वाधवा यांची नावं टाकण्यात आली आहेत. (Case filed against businessman Ram Wadhwa of Ulhasnagar for selling land by fraud)

जमीन लाटून परस्पर विकल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा

राम वाधवा यांच्यासह अन्य दोघांवर जमीन लाटून परस्पर विकल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. उल्हासनगरातील कापड व्यापारी परमानंद माखिजा यांची उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील ओटी सेक्शनमध्ये 770 स्क्वेअर फूट जागा होती. ही जागा 2019 साली बनावट कागदपत्रांच्या आधारे राजेश तलरेजा यांना विकण्यात आली. भरत रोहरा, अजीज शेख आणि राम वाधवा या तिघांनी संगनमत करून जागेची खोटी कागदपत्रं बनवली आणि त्याआधारे स्थानिक वृत्तपत्रात हरकतीची सूचनाही प्रसिद्ध केली. तसेच राजेश तलरेजा यांच्याकडून 50 हजार रुपये टोकन घेऊन त्यांना ही जागा विकली, असा जागेचे मूळ मालक परमानंद माखिजा यांचा आरोप आहे.

राम वाधवा यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, याबाबत राम वाधवा यांना विचारलं असता, हा गुन्हा राजकीय दबावापोटी दाखल करण्यात आलेला असून माझी चंद्रावर जमीन असताना मी इथे जागा कशाला बळकावेन? असा सवाल त्यांनी केला. तसंच आपण पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असून या प्रकरणात काहीही कागदपत्रच नसल्यानं पुढे काहीही निष्पन्न होणार नाही, असंही ते म्हणाले. (Case filed against businessman Ram Wadhwa of Ulhasnagar for selling land by fraud)

इतर बातम्या

VIDEO : उल्हासनगरात भरधाव कारचालकाची अनेक गाड्यांना धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

Breaking News : अखेर राणा दाम्पत्याला मुंबईत अटक, आजची रात्र पोलिस ठाण्यात जाणार? चिथावणीखोर वक्तव्याचा आरोप

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.