VIDEO: दाट धुक्यांमुळे लोकल पाऊण तास लेट, प्रवाशांचा खोळंबा; रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी
दाट धुक्यांमुळे मध्य रेल्वेची लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. सकाळी सकाळीच दाट धुक्यामुळे लोकलचा खोळंबा झाला.
बदलापूर: दाट धुक्यांमुळे मध्य रेल्वेची लोकल (central railway) अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. सकाळी सकाळीच दाट धुक्यामुळे ( fog) लोकलचा खोळंबा झाला. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. बदलापूर (badlapur), अंबरनाथ, उल्हासनगर या स्थानकांवर तर तोबा गर्दी झाली होती. अर्धा ते पाऊण तासानंतर उशिराने आलेली लोकल पकडण्यासाठी चाकरमान्यांची एकच झुंबड उडाली होती. एकमेकांना धक्काबुक्की करतच चाकरमानी आत शिरतांना दिसत होते. मात्र, तर काहींना लोकल पकडता न आल्याने त्यांना पुन्हा अर्धा पाऊण तासपर्यंत रेल्वे स्थानकात तिष्ठत राहावे लागले. लोकलचा खोळंबा आणि वाढती गर्दी यामुळे चाकरमानी प्रचंड वैतागले होते. लोकल खोळंब्यामुळेही लेटमार्क लागणार म्हणून अनेक चाकरमानी त्रस्त झाले होते.
आज सकाळी सकाळीच चाकरमान्यांना लोकलच्या खोळंब्याचा मोठा फटका बसला. दाट धुक्यामुळे लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होती. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं लोकलसेवेवर परिणाम झाला होता. लोकल लेट झाल्यानं रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. बदलापूर रेल्वे स्थानकात तर सकाळी 7.14 ची लोकल 7.40 वाजता आली. तर 7.51 ची लोकल 8.50 ला आली. तर 8.10 ची लोकल 7.30ला आली होती. त्यामुळे रेल्वे स्थानकात तोबा गर्दी झाली होती. कामावर जायच्या वेळेलाच लोकलने दगा दिल्याने चाकरमानी प्रचंड वैतागले होते. लोकल लेट असल्याने आणि लेट येणारी लोकल भरून येत असल्याने अनेकांना कामावर जाणं मुश्किल झालं. त्यामुळे काहींनी थेट एसटीतून प्रवास करणं सोयीस्कर समजलं. तर काहींनी घरूनच काम करणं पसंत केलं.
मुंबईतही धुरकट वातावरण
मुंबईत आज पून्हा धूरकट वातावरण तयार झालं होतं. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 180 वर गेला होता. कुलाबा इथे 190, बांद्रा इथे 173 वर तर काही ठिकाणी हा 274 वर पोहोचला होता. सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याने त्यामुळे हायवेवर दृष्यमानता काही प्रमाणात कमी झाली होती. मुंबईच्या कुलाबा ते दहीसर आणि मुलूंड ते सीएसएटीपर्यंत सर्वत्र धूक्यांचं वातावरण होतं. तसेच आज कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.
72 तासांचा मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेने मुंबई विभागात ठाणे आणि दिवा स्थानकदरम्यान 72 तासांचा मेगा ब्लॉक घोषित केला आहे. कोकण रेल्वे मार्गांवरील अनेक गाड्याचे वेळापत्रक 5, 6 आणि 7 फेब्रुवारीला विस्कळीत झाले आहे. याबाबत कोकण रेल्वेकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या मेगा ब्लॉकचा कोकण रेल्वे प्रवासावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत जवळपास 20 गाड्या रद्द होणार असून काहींच्या वेळा बदलल्या आहेत. याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
संबंधित बातम्या:
संजय राऊतांच्या व्याह्यांचा वानखेडेंना झटका, नवी मुंबईतील हॉटेलचा बार परवाना कायमचा रद्द