BREAKING : ऐन गर्दीच्या वेळी ‘मध्य रेल्वे’ विस्कळीत, वाहतूक सेवा पुन्हा कधी सुरळीत होणार?

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे रात्री साडे आठ ते नऊ वाजेची वेळ म्हणजे गर्दीचा वेळ असतो. असं असताना मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

BREAKING : ऐन गर्दीच्या वेळी 'मध्य रेल्वे' विस्कळीत, वाहतूक सेवा पुन्हा कधी सुरळीत होणार?
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 9:37 PM

कल्याण : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाल्याची बातमी समोर आलीय. काही तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे रात्री साडे आठ ते नऊ वाजेची वेळ म्हणजे गर्दीचा वेळ असतो. असं असताना मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे दिवसभर काम करुन घरी जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जाण्याची वेळ आलीय. मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकापासून कसारापर्यंत जाणारी वाहतूक विस्कळीत झालीय.

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच कपलिंग तुटले आहे. त्यामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम पडलाय. कल्याणहून कसाऱ्याच्या दिशेला जाणारी वाहतूक बंद पडली आहे. कसाऱ्याहून अनेक जण मुंबईत कामानिमित्ताने येतात. याशिवाय आज आठवड्याचा पहिला दिवस आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

हे सुद्धा वाचा

वाहतूक पूर्ववत कधी होणार?

प्रवाशांची कल्याण आणि टिटवाळा रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होतेय. दरम्यान, विस्कळीत झालेली ही सेवा पुन्हा पूर्वरीत कशी होणार? असा प्रश्न अनेक प्रवाशांकडून उपस्थित होतोय. त्यावर रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आलीय. वाहतूक सुरळीत होण्यासाठी 30 ते 45 मिनिटं लागतील, अशी माहिती रेल्वे प्रसासनाने दिलीय.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.