कल्याणमध्ये 72 वर्षीय आजी रांगेत, 8 तास उभं राहिल्यानं तरुणही कोसळला, तरीही लसीचं कुपन नाहीच

कल्याणमध्ये एकीकडे लसीचा तुटवडा, तर दुसरीकडे नियोजनाचा अभाव असल्याचं दिसतंय. आठ आठ तास रांगेत उभे राहून देखील लोकांना लस मिळत नसल्याने नागरिकांचा रोष अनावर होतोय. असाच प्रकार कल्याणच्या अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर घडला आहे. या ठिकाणी तरुणांपासून 72 वर्षीय आजींपर्यंत सगळेच तासंतास रांगेत उभे राहिले.

कल्याणमध्ये 72 वर्षीय आजी रांगेत, 8 तास उभं राहिल्यानं तरुणही कोसळला, तरीही लसीचं कुपन नाहीच
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 5:12 PM

ठाणे : कल्याणमध्ये एकीकडे लसीचा तुटवडा, तर दुसरीकडे नियोजनाचा अभाव असल्याचं दिसतंय. आठ आठ तास रांगेत उभे राहून देखील लोकांना लस मिळत नसल्याने नागरिकांचा रोष अनावर होतोय. असाच प्रकार कल्याणच्या अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर घडला आहे. या ठिकाणी तरुणांपासून 72 वर्षीय आजींपर्यंत सगळेच तासंतास रांगेत उभे राहिले. एका तरुणाला तर चक्कर येऊन तो कोसळला तरीही लसीसाठी रांगेतच थांबला. मात्र, लसींचा तुटवडा असल्यानं कुपन अर्ध्या तासात संपले. त्यामुळे इतका वेळ रांगेत थांबूनही हाती निराशाच आली. यामुळे नागरिकांनी एकच गोंधळ घातला. संतप्त महिला केडीएमसी उपायुक्तांच्या केबिनमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर अखेर केडीएमसी उपायुक्तांनाही त्यांची केबीन सोडून लसीकरण केंद्रावर जावे लागेल.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे दोन ठिकाणी लसीकरण सुरु आहे. कल्याणमधील अत्रे रंगमंदिराच्या ठिकाणी लोकांनी लसीसाठी रात्री 12 वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. रांग इतकी मोठी होती की ती पार सुभाष मैदानला वळसा घालून होती. प्रवेशद्वाराजवळ नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मात्र, त्यांना कूपन वाटप केले जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला गेला. एका तरुणाला रांगेत जास्त वेळ राहिल्याने त्याला चक्कर आली. तो खाली कोसळला होता, तरी देखील त्याने केंद्र सोडले नव्हते. एका 72 वर्षीय आजी लसीसाठी नातवासोबत रांगेत उभ्या होत्या.

“कूपन वाटपाचे काम सुरु करताच अर्ध्या तासात कूपन संपल्याचं जाहीर”

कूपन वाटपाचे काम सुरु करताच अर्ध्या तासात कूपन संपल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे सोनाली पठारे या संतप्त तरुणीने नागरिकांच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेतली. तिच्यासोबत नागरिक देखील होते. तिला सुरक्षा रक्षकांनी गेटवर अडवले. त्यानंतर तिने उपायुक्त पल्लवी भागवत यांची भेट घेतली.

लसीकरणावर देखरेखीसाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक

पल्लवी भागवत या पोलिसांसह केंद्रावर पोहचल्या. त्यावेळी आज केवळ 1400 नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र, नागरिक जास्त आल्याने गोंधळाची स्थिती उद्भवल्याचं सांगण्यात आलं. यावर देखरेख ठेवण्यासाठी एक अधिकारी नेमला जाईल, असे भागवत यांनी सांगितले.

हेही वाचा :

चांगली बातमी : लवकरच लहान मुलांची स्वदेशी लस येणार, ‘या’ महिन्यापर्यंत मुलांसाठी लस उपलब्ध?

सरकार म्हणत 2 डोसला लोकल प्रवासाची परवानगी, मात्र लसींचा तुटवडा असल्यानं नालासोऱ्यात रात्रभर रांगा

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीसह अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा, लसीकरणाचा वेग मंदावला

व्हिडीओ पाहा :

Citizens are angry over shortage of corona vaccine in Kalyan

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.