मुख्यमंत्र्यांचे साऊथ सुपरस्टार स्टाईल पोस्टर, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’चा संदेश; पोस्टरची चर्चा तर होणार

ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. हजारे यांनी शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांचे साऊथ सुपरस्टार स्टाईल पोस्टर, 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे'चा संदेश; पोस्टरची चर्चा तर होणार
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 2:00 PM

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने संपूर्ण ठाण्यात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे मोठमोठे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. साऊथ सुपरस्टारचे लावतात तसे हे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. हे कटआऊट्स ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत आहेत. या शिवाय आणखी एक पोस्टर्स ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत आहे. हे पोस्टर्स म्हणजे एक व्यंगचित्र आहे. त्यावर भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे, असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे ठाण्यात सध्या या दोन्ही पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात आकर्षित शुभेच्छांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांत्र्यांच्या लुईसवाडी येथील घराला झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर एलईडी स्क्रिनिंग करण्यात आली आहे. लायटिंग्स लावण्यात आल्या आहेत. तर कॅडबरी पुलावर झेंडूच्या फुलांची सजावट करून जीवेत शरद शतम असा संदेश त्यावर लिहिण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचा झेंडा खांद्यावर

मुख्यमंत्र्यांचे निवास्थान असलेल्या लुईसवाडी परिसरातील एक बॅनर मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. हे पोस्टर दुसरं तिसरं काही नसून भलं मोठं व्यंगचित्रं आहे. या व्यंगचित्रात शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत.

एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या पायाशी बसलेले दिसत आहेत. त्यांच्या खांद्यावर शिवसेनेचा झेंडा आहे. तर बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे त्यांना आशीर्वाद देत, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणताना दिसत आहेत. हे व्यंगचित्रं अत्यंत बोलकं झालं आहे. त्यामुळे त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

आनंद आश्रमाला रोषणाई

एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर मोठ मोठे कटआऊट्स लावण्यात आले आहेत. त्यावर एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो आहेत. साऊथ सुपरस्टार प्रमाणेच हे फोटो आहेत. त्यामुळे हे कटआऊट्स सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

याशिवाय आनंद आश्रमाला रोषणाई करण्यात आली आहे. दिवाळीच्या दिवशी ज्या पद्धतीने रोषणाई असते त्याप्रमाणेच हा परिसर उजळून निघाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

त्या शाखेला भेट

ठाण्यातील किसन नगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील किसन नगर नंबर 2 येथील शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी भेट दिली. तसेच केक कापून त्यांनी वाढदिवसही साजरा केला. याच शाखेतून एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता.

मागाठाण्यात केक कापून जल्लोष

मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज येथे बीएमसी स्वच्छता कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांसोबत केक कापून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने कांदिवली पूर्व येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांचे नेते, गरिबांचे मुख्यमंत्री, सर्व सामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आज त्यांचा वाढदिवस सफाई कर्मचाऱ्यांसोबत केक कापून साजरा करण्यात आला, असं प्रकाश सुर्वे म्हणाले.

अण्णांकडून शुभेच्छा

ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. हजारे यांनी शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याची जोडगोळी गतिमान राज्यकारभार करत आहे अशी भावना व्यक्त केली.

तर, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आरोग्य सेवेतील कार्याचे कौतुक करत अण्णा हजारे यांनी डॉ शिंदे यांनाही नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

नागपुरात महापूजा

नागपुरातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना दिर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हवन आणि महापूजा करण्यात आली. युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक हितेश यादव यांच्याकडून या महापूजेचं आयोजन करण्यात ळं होतं. नागपूरातील पारडी परिसरातील शनी मंदिरात हा विधी पार पडला.

आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.