Kalyan Crime : कल्याण आठवडा बाजारात फेरीवाल्यांकडून हफ्ता वसुली, माजी नगरसेवकावर आरोप

| Updated on: Jan 22, 2022 | 7:33 PM

या प्रकरणी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचे म्हणणे आहे की, हे एक राजकीय षडयंत्र आहे. राजकीय खेळी करुन मला फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. माझी एक केस सुरु आहे. त्यातील आरोपीला जामीन झाला आहे. त्याच्या विरोधात मी पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे.

Kalyan Crime : कल्याण आठवडा बाजारात फेरीवाल्यांकडून हफ्ता वसुली, माजी नगरसेवकावर आरोप
कल्याण आठवडा बाजारात फेरीवाल्यांकडून हफ्ता वसुली
Follow us on

कल्याण : फेरीवाल्यांना धंदा लावण्यासाठी हप्ता वसूल केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा व्हीडीओसुद्धा समोर आला आहे. या आरोपानंतर डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणात माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. पोलिसांनी योग्य तपास करावा असा खुलासा कुणाल पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात दीपाली नावाच्या महिलेच्या फिर्यादीनुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संजय सिंग , नरेश, रोहन, मामा आणि माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा समावेश आहे. दीपाली हिने दोन व्हीडीओ क्लीपसुद्धा समोर आणल्या आहेत. ज्या क्लीपमध्ये काही लोक पैसे घेत आहे. (Collected money from peddlers for setting up stalls in Kalyan)

दोन लोक पैसे गोळा करीत असल्याचा एका महिलेचा आरोप

कल्याण पूर्व भागातील आडीवली परिसरात आठवडा बाजार लावला जातो. कोविडच्या काळात आठवडी बाजार बंद असताना या परिसरात मोठ्या प्रमाणात स्टॉलधारक बसतात. शेकडो स्टॉलधारकांकडून स्टॉल लावण्याच्या बदल्यात पैसे घेतले जातात असा आरोप स्टॉलधारक एका महिलेने केला आहे. दीपाली जाधव असे या महिलेचे नाव आहे. ती कपडे विक्रीचा स्टॉल लावते. दीपाली हिचा आरोप आहे की, काल तिच्याकडे दोन जण आले. त्यांनी पैशाची मागणी केली. संजय सिंग आणि नरेश या दोघांनी तिच्याकडे मागणी केली. दीपाली यांनी आज धंदा झालेला नाही. मी पैसे देऊ शकत नाही असे दीपाली यांनी सांगितले. त्या दोघांनी जबरदस्तीने पैसै मागण्यास सुरुवात केली. दीपालीचे म्हणणे आहे की, हे दोघे कुणाल पाटील यांच्या ऑफीसमधील आहेत.

हे एक राजकीय षडयंत्र : कुणाल पाटील

या प्रकरणी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचे म्हणणे आहे की, हे एक राजकीय षडयंत्र आहे. राजकीय खेळी करुन मला फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. माझी एक केस सुरु आहे. त्यातील आरोपीला जामीन झाला आहे. त्याच्या विरोधात मी पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवून गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करावी. मला आणि माझ्या कुटुंबियांना योग्य न्याय द्यावा. या प्रकरणी मानपाडा पोलिसानी संजय सिंग नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मात्र कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला आहे. (Collected money from peddlers for setting up stalls in Kalyan)

इतर बातम्या

Navi Mumbai Crime : नेरुळमध्ये जन्मदात्यांकडून पोटच्या पोरांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

Pune crime |धक्कादायक ! पुण्यातन गुंडांच्या टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर गोळीबार