Congress protest : तुरुंगात टाकलं तरी ‘आरे बचाव’चं आंदोलन सुरूच राहील, ईडी सरकारचा निषेध; काँग्रेस कार्यकर्ते ठाण्यात आक्रमक

| Updated on: Aug 21, 2022 | 11:00 AM

आरेमधील झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन करणार, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये हे आंदोलन करण्यात आले.

Congress protest : तुरुंगात टाकलं तरी आरे बचावचं आंदोलन सुरूच राहील, ईडी सरकारचा निषेध; काँग्रेस कार्यकर्ते ठाण्यात आक्रमक
आरे कारशेडविरोधात ठाण्यात काँग्रेसचं आंदोलन
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : तुरुंगात टाकले तरी आरे बचावचे आंदोलन सुरूच राहील, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. ठाण्याच्या लुईसवाडीत काँग्रेसने आंदोलन (Congress protest) केले आहे. यावेळी राज्य सरकारविरोधा घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिकाही काँग्रेसने घेतली आहे. दरम्यान, यावेळी आंदोलकांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत होते, यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. आरे कारशेडवरून (Aarey Metro Station) राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच काँग्रेसने आंदोलन करत या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. मात्र पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली आहे. त्यांची धरपकड करण्यात येत आहे. मात्र कितीही कारवाई केली, तरी मागे हटणार नसल्याचे कार्यकर्ते यावेळी म्हणाले.

‘तुघलकी निर्णय मागे घेतल्याशिवाय थांबणार नाही’

आरे कारशेडविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईत मेट्रोसाठी झाडांची कत्तल केली जाणार आहे. याविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून आंदोलन केले जात आहे. तुघलकी निर्णय मागे घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ईडी सरकारचा निषेध, आरे वाचवल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा निश्चय यावेळी काँग्रेसच्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन

आरेसंदर्भातील आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत. आरेमधील झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन करणार, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये हे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 500 मीटर अंतरावर असणाऱ्या कॅडबरी जंक्शन याठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस आक्रमक

आरे वाचवण्यासाठी आक्रमक भूमिका

पोलिसांनी यावेळी कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मागील काही तासांपासून या कार्यकर्त्यांनी आरे वाचवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. वाट्टेल ते करण्याची आमची तयारी आहे, मात्र आरे वाचवणारच, असे काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले. आम्हाला तुरुंगात टाकले तरी आरे बचावचे आंदोलन सुरूच राहील, असे कार्यकर्ते यावेळी म्हणाले.