ठाणे : उल्हासनगरच्या कॅम्प 4मधील ब्राह्मणपाडा परिसरात धुळवडीच्या दिवशी दुपारी 8 ते 10 जाणांनी तीन तरुणांना (youths) मारहाण केल्याची घटना घडलीय. या मारहाणीत (Beating) एका तरुणाला जास्त मार लागला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. अवधूत साळवे हा तरुण मित्रांसह धुळवड (Holi festival)साजरी करत असतानाच अचानक इतर काही तरुणांचा त्याच्याशी वाद झाला. यानंतर वाद वाढत गेला. या तरुणांच्या वादाच रुपांतर काही वेळात मारहाणीत झालं. त्यानंतर समोरील आठ ते दहा जणांनी मिळून अवधूत साळवे आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. या मारहाणीत मंगल गुप्ता या तरुणाला जास्त मार लागल्याची माहिती आहे. मंगल गुप्ता याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर विष्णू वराडे आणि अवधूत साळवे हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांकडून (Police) अधिक तपास करत आहेत.
होळी आणि धुळवडीचा सण राज्यभरात उत्साहात साजरा झाला. पण, तुरळक ठिकाणी वादाच्या घटनाही घडल्याचं दिसून आलं. तसाच प्रकार उल्हासनगरात दिसून आला. उल्हासनगरच्या कॅम्प 4मधील ब्राह्मणपाडा या भागात धुळवडीत तरुणांमध्ये वाद झाला आणि तो वाढत गेल्यानं मारहाण झाली. दुपारी 8 ते 10 जाणांनी तीन तरुणांना मारहाण केल्याची घटना घडलीय आणि ती वाऱ्यासारखी पसरली. या मारहाणीत एका तरुणाला जास्त मार लागला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
धुळवड म्हटलं की तरुण मंडळी एकत्र येऊन मजा करतात. यात किरकोळ वादही होतात. ब्राह्मणपाडा परिसरात धुळवडीच्या दिवशीही किरकोळ वाद झाला. मात्र, या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. अवधूत साळवे हा तरुण मित्रांसह धुळवड साजरी करत असताना तेथे अचानक काही तरुणांचा त्याच्याशी वाद झाला. हा वाद त्यानंतर वाढतच गेला. या तरुणांच्या वादाच रुपांतर काही वेळात मारहाणीत झालं. त्यानंतर समोरील आठ ते दहा जणांनी मिळून अवधूत साळवे आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. या मारहाणीत मंगल गुप्ता या तरुणाला जास्त मार लागल्याची माहिती आहे. आता या संपूर्ण प्रकाराचा तपास पोलीस करत आहेत.
राज्यात विविध ठिकाणी धुळवड साजरी होत असताना पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाद उद्भवू नये यासाठी विशेष पथकही तैनात करण्यात आले होते. मात्र, उल्हासनगरसारखी तुरळक ठिकाणी काही वादाच्या घटना समोर आल्यायेत. आता उल्हासनगरमधील प्रकाराचा पोलीस तपास करत आहेत.
इतर बातम्या