Dahihandi 2022: दहीहंडीच्या थरांना आर्थिक आधार, विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकाला मिळणार 21 लाखांचे बक्षीस
प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीला सार्वजनिक सुटी जाहीर करावी, यासाठी पाठपुरावा करत होते. यंदा त्यांच्या या निवेदनावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला. प्रताप सरनाईक यांची मागणी मान्य झाली.
ठाणे, गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्वच सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. यंदा मात्र राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केल्याने दहीहंडी (Dahihandi 2022) उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. त्याच अनुषंगाने संस्कृती युवा प्रतिष्ठानकडून ठाण्यात भ्रव्य उत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. यात लाखोंची बक्षीसे जाहीर झाल्याने गोविंदा मंडळांमध्ये या उत्सवाची चुरस रंगणार आहे. ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक फाऊंडेशन व शिवसेना यांच्यातर्फे यंदा भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव होणार असून दहीहंडीचा विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकास 21 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
दोन वर्षांनंतर दहीहंडी उत्सव मुत्त्पणे साजरा करता येणार आहे. त्यामुळे राज्यभरात सर्व आयोजकांनी दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करावे. हा हिंदुत्वाचा उत्सव जल्लोषात साजरा करावा – प्रताप सरनाईक
आमदार तथा दहीहंडी उत्सव आयोजक केले आहे. उत्सवात येणाऱ्या प्रत्येक पथकाला थराप्रमाणे बक्षीस दिले जाईल. यंदा दहीहंडीच्या दिवशो राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे हा उत्सव तरुणाईला आनंदाने साजरा करता येणार आहे. शिवाय नागरिकही उत्सवात सहभाग होऊन गोविंदा पथकांचा थरार पाहू शकतील.
प्रताप सरनाईक यांची मागणी मान्य
प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीला सार्वजनिक सुटी जाहीर करावी, यासाठी पाठपुरावा करत होते. यंदा त्यांच्या या निवेदनावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला. प्रताप सरनाईक यांची मागणी मान्य झाली. शिंदे यांनी आधीच मला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांनी मी मुख्यमंत्री आहे, असं समजा असं म्हटलं होतं. त्यामुळं शिंदे गटातील आमदारांनी केलेल्या बहुतेक मागण्या ते मान्य करताना दिसून येतात.
यंदा कुठलेही निर्बंध नसणार
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळं सणांवर निर्बंध राहत होते. पण, यंदा अशाप्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. त्यामुळ सणं धुमधडाक्यात साजरी केली जाणार आहेत. त्यात गोविंदाचा म्हणजे दहीहंडीच्या सणाला विशेष महत्त्व आहे.