आमच्याकडून कामात कॉम्प्रमाईज नाही, पण तुम्ही नियम पाळा : अजित पवार

"मास्क वापरा, (face mask) कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका", असं उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दरडावलं.

आमच्याकडून कामात कॉम्प्रमाईज नाही, पण तुम्ही नियम पाळा : अजित पवार
अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 1:55 PM

रायगड : “मास्क वापरा, (face mask) कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दरडावलं. ते रायगडमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजना (Nhava-Sheva water supply scheme) भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. कोरोना वाढत आहे, पण विकासकामंही सुरु आहेत. केंद्राकडून जीएसटीचे पैसे येणे बाकी आहेत, मात्र पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड अर्थात कॉम्प्रमाईज करत नाही, असं अजित पवारांनी सांगितलं. (DCM Ajit Pawar on Maharashtra lockdown updates raigad Nhava-Sheva water supply scheme)

अजित पवार म्हणाले, “1 फेब्रुवारी पासून कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे कार्यक्रम हे साधेपणाने घ्यावे लागत आहेत. राज्यात कोरोनाचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनामुळे सर्व कार्यक्रम साधेपणाने साजरे करा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन पुढे जायचं आहे. सर्व विकासकामं जोरात सुरु आहेत, पाणी हे जीवन आहे, त्याचा योग्य वापर करा, पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरु केला”

आजचा हा कार्यक्रम रायगडसाठी महत्वचा आहे. 400 कोटीपेक्षा जास्त खर्च नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजनेसाठी केला जातोय. शहरीकरण, औद्योगीकरण वाढतंय. त्यामुळं त्यासाठी पाणी पुरवठा सुद्धा वाढवावा लागणार आहे. केंद्रकडून जीएसटीची मोठी रक्कम अजून येणं बाकीच आहे. पायाभूत सेवेसाठी आम्ही कुठेही तडजोड अर्थात कॉम्प्रमाईज करत नाही. कोस्टल रोड, मेट्रो, बोगदे, गोवा- मुंबई हायवे त्यांचं काम सुरू आहे. राजकारण न आणता कोकणचा कायापालट व्हावा, असं अजित पवार यांनी नमूद केलं.

कोरोनच संकट वाढत आहे. लॉकडाऊन पुन्हा लागू होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मास्क वापरा. कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका, असं अजित पवार म्हणाले.

एक तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल, असं अजित पवारांनी सांगितलं.

(DCM Ajit Pawar on Maharashtra lockdown updates raigad Nhava-Sheva water supply scheme)

संबंधित बातम्या   

Maharashtra Lockdown Updates : …तर आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल : मुख्यमंत्री

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.