रक्तदान शिबिरात प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली आणि त्याच कार्यक्रमात वापर, केडीएमसीच्या उपायुक्तांना पाच हजार रुपयांचा दंड
महापालिका 2 ते 9 जानेवारी दरम्यान महापालिकेकडून प्लास्टिक विरोधी मोहिम राबविली जात आहे. त्यापूर्वी महापलिकेने कल्याण डोंबिवलीतील दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची कारवाई केली होती. आज रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात प्लास्टिक न वापरण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.
कल्याण : केडीएमसीमध्ये आज सुरक्षा रक्षक विभाग आणि महापालिकच्या वतीने संयुक्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरादरम्यान उपस्थित आयुक्त, उपायुक्त, अधिकारी यांच्या सुरक्षा विभागाच्या प्रमुख उपायुक्त पल्लवी भागवत यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. या दरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित घनकचरा व्यवस्थापन प्रमुख रामदास कोकरे यांच्या लक्षात आले की ज्या पुष्पगुच्छ पल्लवी भागवत यांनी मान्यवरांना दिले आहे ते सर्व पुष्पगुच्छ हा प्लास्टीकमध्ये गुंडाळलेला होता. त्यामुळे आयुक्तांच्या समोरच घनकचरा व्यवस्थापनक रामदार कोकरे यांनी प्लास्टीक वापरल्या प्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची घोषणा केली. हे पाहून सगळेच हैराण झाले.
चांगल्या कामाची सुरुवात घरापासूनच
अनेकदा कल्याण डोंबिवली महापलिका विविध जनजागृती करण्यासाठी नागरिकांना आवाहन करीत असते. काही प्रसंगी महापालिकेकडून त्याचे पालन केले जात नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असे असते. मात्र आज महापालिकच्या कार्यक्रमात प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेतली गेली. त्याच कार्यक्रमात पुष्पगुच्छाला प्लास्टिकचे आवरण वापरल्याने घनकचरा विभागाच्या उपायुक्तांनी चक्क महिला उपायुक्तास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चांगल्या कामाची सुरुवात घरापासून केल्याचे मत घनकचरा उपायुक्तांनी व्यक्त केले आहे.
महापालिकेकडून प्लास्टिक विरोधी मोहिम
महापालिका मुख्यालयात सुरक्षा रक्षकांनी रक्तदान शिबीराचे आयोजन आज करण्यात आले होते. या कार्यक्रमास खुद्द आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला. मात्र महापालिका 2 ते 9 जानेवारी दरम्यान महापालिकेकडून प्लास्टिक विरोधी मोहिम राबविली जात आहे. त्यापूर्वी महापलिकेने कल्याण डोंबिवलीतील दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची कारवाई केली होती. आज रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात प्लास्टिक न वापरण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. याच कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ देण्यात आले.
या कार्यक्रमास उपायुक्त पल्लवी भागवत यांच्याकडून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे हे देखील उपस्थित होते. त्यांच्या नजरेत ही बाब आली की, स्वागतासाठी ज्या पुष्पगुच्छ दिला जात आहे. त्याला प्लास्टिकचे आवरण आहे. त्यांनी या प्रकरणी उपायुक्त भागवत यांनी प्लास्टिक वापर केल्याने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्लास्टिकचा वापर न करण्याची सवय महापालिकेच्या सर्व कामगार अधिकारी वर्गास लागली पाहिजे. (Deputy Commissioner of Kalyan Dombivali fined Rs. 5,000 for using plastic)
इतर बातम्या
ठाण्यात दहावी, बारावीचे वर्ग सुरू राहणार, शाळांबाबत नवी नियमावली काय? वाचा सविस्तर