‘आपला एकच बिझनेस, आपली एकच गुंतवणूक…’, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

"आपला एकच बिझनेस आहे, आपली एकच गुंतवणूक आहे, आपली गुंतवणूक ही जनता आहे. जनतेचं प्रेम ही आपली गुंतवणूक आहे. जनतेचा आशीर्वाद मिळवण्याकरता जेवढी अधिकाधिक गुंतवणूक आपल्याला करता येईल ते आपल्याला निश्चितपणे करायची आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'आपला एकच बिझनेस, आपली एकच गुंतवणूक...', देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 6:31 PM

ठाण्यात भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. “सर्वांना गुढीपाडवा शुभेच्छा. महाराष्ट्रात आणि देशात उंच गुढी गेली पाहिजे. अनेक लोकांनी या कार्यालयासाठी खूप मेहनत घेतली. रेमंड यांचे आभार. अतिशय वेगाने बांधकाम केलं. योग्य किंमत भारतीय जनता पक्षाने दिली आहे. कोणतेही डोनेशन नाही. भारतीय जनता पक्षामध्ये आणि अन्य पक्षांमध्ये काय फरक असेल, विविध पक्षाचे नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे हे बघतात, आणि आपले नेते भारतीय जनता पक्ष कशी झाली पाहिजे हे बघतात. भारतीय जनता पक्ष कार्यालय न्याय कसे मिळेल हे बघतं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “आपला एकच बिझनेस आहे, आपली एकच गुंतवणूक आहे, आपली गुंतवणूक ही जनता आहे. जनतेचं प्रेम ही आपली गुंतवणूक आहे. जनतेचा आशीर्वाद मिळवण्याकरता जेवढी अधिकाधिक गुंतवणूक आपल्याला करता येईल ते आपल्याला निश्चितपणे करायची आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून जो संघर्ष उभा करावा लागतो तो संघर्ष उभ करण्याचं काम करतो. म्हणूनच मला असं वाटतं की कार्यालय हे अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची वास्तू आहे. खरं म्हणजे अतिशय सुंदर कार्यालय आपण तयार केलंय. भारतीय जनता पार्टी आज आधुनिकतेकडे जात आहे. आज आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग सगळीकडे करतो. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपली कनेक्टिव्हिटी वाढवत आहोत. त्यामुळे एक अतिशय चांगलं कार्यालय झालंय. पण नुसतं दिसायला सुंदर कार्यालय फायद्याचं नाही, तर इथे बसणारे जे लोक आहेत ते आलेल्या व्यक्तीचे स्वागत कसं करतात, त्याच्याकडे त्याच्या समस्या असतील तर सोडवण्याचा प्रयत्न कसा करतात, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला येथे आल्यानंतर आपल्या घरी आल्याची भावना होते की नाही याच्या आधारावर त्या कार्यालयाचं महत्त्व ठरतं”, असं फडणवीस म्हणाले.

‘सगळीकडे आपले कार्यकर्ते’

“खरं म्हणजे हा जो काही ठाणे विभाग आहे हा भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय सुंदर आहे. अर्थातच आपले मित्रपक्ष देखील आपल्यासोबत या ठिकाणी वारंवार राहिलेले आहेत. पण भारतीय जनता पक्षाचे काम सातत्याने मजबुतीने या ठिकाणी वाढलेलं आहे. आज संपूर्ण ठाणे विभागामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सगळीकडे आपले कार्यकर्ते पाहायला मिळतात. विविध निवडणुकांमध्ये आपल्याला चांगलं यश मिळतं. ठाणे विभागातली जनता आहे अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘इथे अनेकांच्या अपेक्षा आहेत की…’

“या विभागातले सर्व ज्येष्ठ नेते आमदार हे आपल्या पक्षात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एकप्रकारे ठाणे विभाग जो आहे हा भारतीय जनता पक्षाकरता एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आणि या सगळ्या विभागांमध्ये आपलं काम हे सातत्याने वाढत आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारचं सुसज्ज कार्यालय असणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि इथे अनेकांच्या अपेक्षा आहेत की एखादी हेडलाईन वगैरे मी द्यावी. पण माझ्यासारख्या परिपक्व कार्यकर्त्यांनी असं करायचं नसतं. त्यामुळे कुठलीही हेडलाईन निवडणुकीच्या संदर्भात मिळणार नाहीत तर एवढेच मी सांगतो की आपल्याला मोदी यांना पंतप्रधान बनवायचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘आपल्याला कंबर कसावी लागणार’

“आपल्याला कंबर कसावी लागणार आहे. महाराष्ट्रामध्येदेखील 45 ते 40 खासदारांची ताकद आपल्यात आहे. प्रत्येक सीट आपल्याला महत्त्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा मुंबईमध्ये आरबीआयच्या कार्यक्रमात आले असताना सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, एक महिना तुम्हाला दिला. एक महिन्यात काय तयारी करायची आहे करून घ्या. शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी धामधुडाक्यात काम सुरू करणार आहे. अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.