ठाकरे सरकारचा बुरखा फाडायला हवा, हे एका सुरात खोटं बोलतात, देवेंद्र फडणवीस OBC आरक्षणावरुन आक्रमक
एम्पिरिकल डेटा आणि जनगणनेचा डेटा यात सुद्धा कायम बुद्धिभेद केला जातो. केंद्राकडे आहे तो जनगणनेचा डेटा आणि त्याचा आरक्षणाशी संबंध नाही. आरक्षण देण्यासाठी एम्पिरिकल डेटा हवा आहे आणि तो राज्य सरकारच मागासवर्ग आयोगाकडून मिळवू शकते, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी जागर अभियानादरम्यान म्हटलं.
ठाणे: एम्पिरिकल डेटा आणि जनगणनेचा डेटा यात सुद्धा कायम बुद्धिभेद केला जातो. केंद्राकडे आहे तो जनगणनेचा डेटा आणि त्याचा आरक्षणाशी संबंध नाही. आरक्षण देण्यासाठी एम्पिरिकल डेटा हवा आहे आणि तो राज्य सरकारच मागासवर्ग आयोगाकडून मिळवू शकते, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी जागर अभियानादरम्यान म्हटलं. ओबीसी आरक्षण केवळ गेले नाही तर ओबीसी समाजावर आज मोठा अन्याय होतो आहे. याचसाठी हे ओबीसी जागर अभियान आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठाकरे सरकारच्या उदासीनतेमुळे ओबीसी आरक्षण गेले. या सरकारची इको सिस्टीम एका सुरात खोटे बोलते. ओबीसी आरक्षण संपूर्ण देशात गेले नाही तर केवळ आणि केवळ महाराष्ट्रात गेले आहे, असं फडणवीस म्हणाले.
या सरकारचा बुरखा फाडला पाहिजे
मी योगेश टिळेकर आणि ओबीसी मोर्चाचे अभिनंद करेन. सर्वत्र जाऊन हा कार्यक्रम केला पाहिजे. ओबीसीं समाजामध्ये जाऊन या सरकारचे सत्य मांडायला हवं ,कशा प्रकारे आरक्षण गेलं, कशा प्रकारे अन्याय केला जातोय यासर्व गोष्टी समाजात सांगाव्या लागतील. या सरकारचा बुरखा टरा टरा फाटला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ओबीसी समाजाचे खरे मारेकरी ठाकरे सरकार आहे. आम्ही सगळ्यांनी त्यावेळी ओबीसी आरक्षण टिकवले. या सरकारला 15 डिसेंबर 2019 रोजी सांगितले की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा. राज्य मागास आयोग गठीत करा आशा तीन टेस्ट करा तुमच्या आरक्षण कोणीही हात लावणार नाही. मात्र, सरकारनं काही केलं नाही. या सरकारला जनगणना नको राज्य मागास आयोग नकोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सरकार ओबीसी मंत्र्यांचही ऐकत नाही
ओबीसीच्या आरक्षणाबाबत आता जाऊन अध्यादेश काढला. सरकारचे काम कायदा बनवणे आहे. या सरकारला खोटे बोलले नाही तर दिवस जात नाही. सामान्य माणसाला देखील तेच खरे वाटते. महाविकास आघाडी सरकारच्या करंटेपणामुळं ओबीसी आरक्षण गेलं आहे. महाराष्ट्रात अनेक जाती आहे, डेटा चुकीचा बनवला गेला. केवळ मागास वर्गीयचा डेटा सांगितला. मात्र, हे खोटे बोलणारे सरकार आहे. केंद्रावर बोट दाखवत आहे.
आमच्या सरकारनं श्याम राव पेठे मंडळाला 50 कोटी रुपये दिले. त्या काळाच्या आधीच्या सरकारने आरक्षण दिले नाही. अनेक ओबीसी विद्यार्थ्यांना देखील अनेक संधी दिल्या. शिष्यवृत्ती दिली , ओबीसी महामंडळ पैसे तसेच पडले आहे. या सरकारनं एक फुटकी कवडी दिली नाही. ओबीसी मंत्री यांचे देखील हे सरकार ऐकत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
इतर बातम्या:
Devendra Fadnavis slam MVA Government responsible for OBC Political reservation cancelation