Ambernath Temple : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी, श्रावण सोमवार असल्याने भाविकांच्या रांगा
सध्या श्रावण महिना सुरु झाला असू, आज श्रावण महिन्याचा पहिलाच सोमवार होता. श्रावणी सोमवारी बहुतांश भक्तांचा उपवास असतो. यामुळे भक्त मोठ्या प्रमाणावर मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
अंबरनाथ : श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरा (Shiv Temple)त भाविकांची अलोट गर्दी (Rush) पाहायला मिळाली. शिव मंदिरापासून ते मुख्य रस्त्यावरील कमानीपर्यंत भाविकां (Devotee)च्या रांगा लागल्या होत्या. कोरोना काळानंतर भाविकांच्या गर्दीचा हा उच्चांक पाहायला मिळाला. प्राचीन शिवमंदिराच्या आवारात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणमास उत्सव महिनाभर आयोजित करण्यात आला असून, यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. मंदिराचे पुजारी विजय पाटील आणि रवी पाटील यांच्या वतीने भाविकांसाठी दररोज दुपारी भंडारासुद्धा ठेवण्यात आला आहे.
महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रिघ
अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर हे शिलाहारकालीन असून तब्बल 962 वर्ष जुनं आहे. या मंदिरातील महादेवाची अंबरेश्वर अशी ओळख असून त्यावरूनच अंबरनाथ हे शहराचं नाव पडलं आहे. ठाणे जिल्ह्यातील एकमेव प्राचीन शिवालय असलेलं हे मंदिर शंकराचं अतिशय जागृत स्थान म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी इथं हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. तर महाशिवरात्रीला मंदिर परिसरात ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी जत्रा भरते.
सध्या श्रावण महिना सुरु झाला असू, आज श्रावण महिन्याचा पहिलाच सोमवार होता. श्रावणी सोमवारी बहुतांश भक्तांचा उपवास असतो. यामुळे भक्त मोठ्या प्रमाणावर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. शिव मंदिरात एकाच दिवसात राज्यभरातून लाखो भाविक शिवमंदिरात दर्शनासाठी येत असतात. आज पवित्र श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची प्राचीन शिवमंदिरात रिघ लागली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेता कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्राचीन शिवमंदिराचे पुजारी पाटील कुटुंबीय आणि पोलिसांनी चोख नियोजन ठेवलं होतं. (Devotees flock to see the ancient Shiva temple of Ambernath)