रोशनी शिंदे प्रकरणी डॉक्टरांचा मोठा खुलासा; म्हणाले, तिच्या शरीरावर मारहाणीच्या…
काल रात्री साडे 10 च्या सुमारास रोशनी शिंदे सिव्हिल रुग्णालयातून माझ्या रुग्णालयात दाखल झाली. तिच्या नातेवाईकांनी माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. काही लोकांनी हल्ला केल्याचं तीनं सांगितलं.
ठाणे : ठाण्यातील कासार वडवली येथे शिंदे आणि ठाकरे गटात वाद उफाळून आलाय. सोशल मीडियावरून वादग्रस्त पोस्टवरून ठाकरे गटाची रोशनी शिंदे हिला मारहाण करण्यात आली. असा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केलाय. ठाण्यातील कासार वडवली पोलीस (Thane Police) ठाण्यात मध्यरात्री आरोपींविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. रोशनी शिंदे (Roshni Shinde) हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या प्रकृतीसंबंधात डॉक्टरांनी मोठा खुलासा केलाय.
रोशनी शिंदे हिच्या प्रकृतीबाबत डॉक्टर उमेश आलेगावकर म्हणाले, काल रात्री साडे 10 च्या सुमारास रोशनी शिंदे सिव्हिल रुग्णालयातून माझ्या रुग्णालयात दाखल झाली. तिच्या नातेवाईकांनी माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. काही लोकांनी हल्ला केल्याचं तीनं सांगितलं. प्राथमिक उपचार सिव्हील हॉस्पिटलमध्ये करण्यात आले.
शरीरावर मारहाणीच्या खुणा
रोशनी शिंदे हिच्या शरीरावर हलक्या मारहाणीच्या खुणा होत्या. मुका मार पाठीवर आढळला. दोन-तीन वेळी उटली झाल्याचे रुग्णानं सांगितलं. युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट केली ती निगेटिव्ह आहे. आज सकाळी दुसऱ्यांनी पुन्हा टेस्ट केली. तीसुद्धा निगेटिव्ह आहे, असं डॉक्टर उमेश आलेगावकर यांनी सांगितलं.
एक्सरेत कोणतेही फ्रॅक्चर नाही
रोशनी शिंदे हिच्या पोटामध्ये काही इजा झाली का याबाबत सोनोग्राफी केली. पण अंतर्गत कोणतीही जखम किंवा रक्तस्त्राव नाही. महिलेची प्रकृती स्थिर आहे. एक्सरे करण्यात आला. तिथंही कोणतेही फॅक्चर नाही. कुठेही अॅक्टिव्ह रक्तस्राव नाही.
या मारहाणीमुळे जीवितास कुठलाही धोका दिसत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण, खबरदारी म्हणून आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असंही डॉक्टर उमेश आलेगावकर यांनी म्हंटलं.
क्लिनीकल एक्सामिनेशन करण्यात आले. अॅक्टिव्ह रक्तस्त्राव नाही. जीवितनाही होईल, अशी काही परिस्थिती नाही. तरीही काळजी म्हणून आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. रुग्ण स्थित आहे, असं डॉक्टर उमेश आलेगावकर यांनी सांगितलं.
स्वतः उद्धव ठाकरे हे रोशनी शिंदे यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय.