कल्याणमध्ये राजकीय गदारोळ, सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमध्येच प्रचंड धुसफूस

Kalyan Politics | कल्याणमध्ये सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. विशेष म्हणजे कल्याण पूर्वेत कायदा आणि सुव्यवस्था खुंटीला टांगलेली आहे की काय? अशी परिस्थिती असताना आता लोकप्रतिनिधींमध्ये भलताच राजकीय वाद सुरु आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेच्या नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर आहे की काय? अशी परिस्थिती आहे.

कल्याणमध्ये राजकीय गदारोळ, सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमध्येच प्रचंड धुसफूस
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 10:18 PM

कल्याण | 17 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये पुन्हा एकदा राजकीय गदारोळ बघायला मिळाला. कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात आज चांगलीच जुंपली. विशेष म्हणजे नुकतंच कल्याणमध्ये एका भिंतीवर भाजपच्या कमळ चिन्हाला पेंटिंग केली म्हणून शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज व्हाट्सअॅपवर आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातीला वाद उफाळून आला.

गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये व्हाट्सअॅप ग्रुपवर हमरीतुमरी झाली. विकास कामांवरुन एकमेकांवर आरोप लावण्यात आले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर घोषणाबाजी केली. दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटताना दिसत होत्या. त्यामुळे कल्याण पूर्वेत तणावाचं वातावरण बघायला मिळत होतं.

सायंकाळी एकमेकांचा भ्रष्टाचार काढण्यासाठी दोघांनी कल्याण पूर्व येथील ड प्रभाग निवडला होता. मात्र कोळसेवाडी परिसरात तणावाचं वातावरण पाहताच पोलिसांनी बंदोबस्त वाढवत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी एकीकडे भाजप कार्यकर्त्यांची महापालिकेसमोर घोषणाबाजी तर दुसरीकडे पोलीस ठाण्याबाहेरच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती.

27 गाव इमारती रजिस्ट्रेशन प्रकरणी पुरावे सादर करा, अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांची होती. तर स्थानिक आमदारांनी विकास काम केली नाही. यावर व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये वाद झाल्याची प्रतिक्रिया महेश गायकवाड यांनी दिली.

गणपत गायकवाड यांचा नेमका आरोप काय?

शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर निवडणूक लढायची नाही, म्हणून कार्यकर्त्यांना आदेश दिल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेचा काही लोकांच्या मनात वाईट विचार असल्याचा आरोपही गणपत गायकवाड यांनी केला.

महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया

दुसरीकडे आम्ही युतीचा धर्म पाळतो. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून युतीसाठी आम्ही नेहमी पुढाकार घेतो. मात्र स्थानिक आमदार कुठेतरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दडपण्याचं काम करतात. ज्या-ज्या वेळेला कल्याण पूर्वचे हिताचं काम असेल लोकप्रतिनिधी काम करत नसेल तर त्याला जाब विचारण्यासाठी आम्ही नक्कीच पुढाकार घेणार, अशी भूमिका महेश गायकवाड यांनी मांडली.

दरम्यान, कल्याण पूर्वेत गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. विशेषत: गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कल्याण पूर्वेत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. गुन्हेगारांना पोलिसांचा कुठलाही धाक राहिलेला नाही. त्यामुळे मुलींवर हल्ल्याच्या, बलात्काराच्या घटना, तसेच विनयभंगाच्या घटना सर्रासपणे घडताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधींनी यावर विचार करणं आणि मार्ग काढणं जास्त अपेक्षित आहे, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.