स्वच्छता अभियानात येथे शिरले राजकारण; निवडणुकीपूर्वीच भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी?

| Updated on: Mar 30, 2023 | 2:45 PM

मोहने टिटवाळा येथे केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्राच्या वतीने स्वच्छता अभियानाच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रशासनाने सर्व पक्षांना आमंत्रित केले.

स्वच्छता अभियानात येथे शिरले राजकारण; निवडणुकीपूर्वीच भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी?
Follow us on

ठाणे : एकीकडे गतिमान सरकार म्हणून शिंदे-फडणवीस ही जोडी एकत्रित काम करते. दुसरीकडे मात्र भाजप आणि शिंदे गटातील वादामुळे एका कार्यक्रमाला ब्रेक लागता लागता राहिलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने मोहने टिटवाळा येथे सार्वजनिक स्वच्छतेचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात कमळाचे चिन्ह लावून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांवर शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. कार्यक्रम पूर्ण झाला. मात्र नंतर हा वाद थेट पोलीस ठाण्यात गेला.

स्वच्छता अभियानात सर्व पक्षांना बोलावलं

मोहने टिटवाळा येथे केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्राच्या वतीने स्वच्छता अभियानाच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रशासनाने सर्व पक्षांना आमंत्रित केले. मोहने टिटवाळ्याच्या भाजपाच्या महिला पदाधिकारीसुद्धा या कार्यक्रमात आल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

भाजपच्या महिलांनी उतरवले कमळाचे चिन्ह

या विभागाच्या भाजपाच्या शहर अध्यक्षा मनीषा केळकर या कमळ पक्षाचं चिन्ह लावून आल्या. त्यामुळे केडीएमसीचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी हरकत घेतली. वॉर्ड अधिकाऱ्यांकडे त्यांनी ही हरकत घेतली. भाजपाच्या महिलांनी कमळाचे चिन्ह उतरवले. कार्यक्रम संपन्न झाल्यावर केळकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

युती धर्म त्यांनीही पाळावा

दुर्गोधन पाटील यांनी शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. इतकंच नाही तर युती धर्म त्यांनीही पाळावा, असा टोलाही त्यांनी लगावला. पाटील यांची हकालपट्टी करण्याचीही मागणी करण्यात आली. मात्र पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. संबंधित कार्यक्रम हा शैक्षणिक होता.

मला बदनाम करण्याचा खटाटोप

सर्व राजकीय पक्षांना तिथे आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी भाजपाच्या महिला कमळ चिन्ह लावून आल्या होत्या. याबाबत मी अधिकाऱ्यांना प्रश्न केला की नेमका कार्यक्रम कोणता आहे? त्यावेळी त्यांनी शैक्षणिक कार्यक्रम असल्याचं सांगितलं. महिलांनी कमळाचं चिन्ह उतरवलं. मात्र मी कोणताही अपशब्द वापरला नाही. मला केवळ बदनाम करण्यासाठी हा खटाटोप चालू असल्याचं पाटील म्हणाले.

पाटील हे शिंदे गटात कार्यरत आहेत. त्यामुळे आतापासूनच दोन्ही पक्षांत राजकीय फटाके फुटायला सुरवात झाली आहे. याप्रकरणी केळकर यांच्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलीस यावर काय अॅक्शन घेतात. दोन्ही पक्ष आपआपसात हा वाद मिटवतात का, हे पाहावं लागेल.