डोंबिवलीच्या खाडीत सापडलेल्या चिमुकल्यांना अजूनही आईची आस

चिमुकल्यांच्या वडिलांचा शोध लागल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला, मात्र आई अद्यापही बेपत्ता आहे

डोंबिवलीच्या खाडीत सापडलेल्या चिमुकल्यांना अजूनही आईची आस
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 1:07 PM

कल्याण : डोंबिवलीत खाडीच्या पाण्यात मधोमध सापडलेल्या दोन चिमुकल्यांचे पितृछत्र शाबूत असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. ठाकुर्लीत राहणारे चिमुकल्यांचे वडील सुब्रतो साहू अखेर पोलिसांसमोर आले. लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी, आर्थिक चणचण आणि पती-पत्नीतील वाद यामुळे चिमुकल्यांवर ही दुर्दैवी वेळ आल्याचं चित्र आहे. सहा महिन्यांच्या बाळासह दोन वर्षांचा चिमुरडा खाडीजवळ सापडल्यानंतर काल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. (Dombivali Children’s father found mother still missing)

पती-पत्नीचे वाद लेकरांच्या अंगलट

चिमुकल्यांच्या वडिलांचा शोध लागल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. मात्र त्यांची आई अद्यापही बेपत्ता आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. त्यानंतर आर्थिक तंगीमुळे आमच्यात थोडे-फार वाद होते, मात्र पत्नी रत्नमाला साहू टोकाचे पाऊल उचलेल, असे वाटत नसल्याचं सुब्रतो साहू सांगतात.

काळजाचा ठोका चुकवणारी घटना

डोंबिवलीतील खाडीत पाण्याच्या मधोमध असलेल्या एका मोठ्या दगडावर सोमवारी (7 डिसेंबर) संध्याकाळी सहा महिन्यांचे बाळ आणि दोन वर्षांचा लहानगा रडत होते. पाण्याची पातळी वाढत असतानाच मुलांच्या रडण्याचा आवाज काही ग्रामस्थांच्या कानावर गेला. त्यांची नजर या दोन्ही लहान मुलांवर गेली आणि सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला. कचोरे गावातील गणेश मुकादम आणि तेजस मुकादम हे दोन तरुण धीराने पाण्यात उतरले. दोन चिमुकल्यांना बाहेर काढून त्यांना विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साबडे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तपास पथके तयार केली. या दोन चिमुकल्यांना सोडून आईने आत्महत्या केली का, असा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. मात्र महिला अद्यापही बेपत्ताच आहे.

पतीला अजूनही आशा

लहान मुलांजवळ आईचा मोबाईल सापडला. त्यानंतर ठाकुर्ली परिसरात राहणारा सुब्रतो साहू ही व्यक्ती पोलिसांसमोर आली. स्नेहांश साहू आणि अयांश साहू अशी मुलांची नावं असल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. आर्थिक परिस्थिती खालावल्याने पत्नी रत्नमाला साहूसोबत वाद व्हायचा. मात्र ती इतक्या टोकाचे पाऊल उचलेल, असं सुब्रतो यांना आजही वाटत नाही.

संबंधित बातम्या –

आई बेपत्ता आणि दोन चिमुरडे भर पाण्यात, काळजाचा ठोका चुकवणारी घटना

(Dombivali Children’s father found mother still missing)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.