Bank Fraud : सर्व्हर हॅक करत बँकेला दीड कोटींचा चुना, डोंबिवली नागरी सहकारी बँकेतील घटना

डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर कोणीतरी अज्ञात इसमाने हॅक करत सर्व्हरमध्ये बेकायदेशीर प्रवेश करत बँकेच्या डाटामध्ये फेरफार केला. बँकेची 1 कोटी 51 लाख 96 हजाराची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ठाणे नौपाडा येथील शाखेत एका ग्राहकाने आपल्या खात्यात अचानक जास्त पैसे आल्याचे निदर्शनास आणून दिले.

Bank Fraud : सर्व्हर हॅक करत बँकेला दीड कोटींचा चुना, डोंबिवली नागरी सहकारी बँकेतील घटना
सर्व्हर हॅक करत बँकेला दीड कोटींचा चुना
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 10:44 PM

डोंबिवली : हॅकर्सच्या रडारवर आता बँका असून विविध ट्रिक्स वापरुन बँकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध डोंबिवली नागरी सहकारी बँके (Dombivli Civic Co-Operative Bank)चा सर्व्हर हॅक (Hacked) करून एका अज्ञात हॅकरने बँकेला दीड कोटीचा चुना लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी बँक प्रशासनाने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे मानपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले. (Dombivli Civic Co-Operative Bank was robbed of Rs 1.5 crore by hacking the bank’s server)

एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर घटना उघडकीस

डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्व्हर कोणीतरी अज्ञात इसमाने हॅक करत सर्व्हरमध्ये बेकायदेशीर प्रवेश करत बँकेच्या डाटामध्ये फेरफार केला. बँकेची 1 कोटी 51 लाख 96 हजाराची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ठाणे नौपाडा येथील शाखेत एका ग्राहकाने आपल्या खात्यात अचानक जास्त पैसे आल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबत त्याने नौपाडा शाखेत तक्रार दिली. डोंबिवली सोनारपाडा येथील मुख्य शाखेत बँक प्रशासनाने याचा तपास केला असता तपासाअंती या बँकेचे डेटा सेंटर नवी मुंबई महापे येथे असून महापे येथून बँकेचा सर्व्हर हॅक करून एका अज्ञात हॅकरने बँकेची दीड कोटीची फसवणूक केल्याचे उघड झाले. अज्ञात हॅकर बँकेची रक्कम कमी बॅलन्स असलेल्या खात्यात वळती करत त्या खात्यातून अज्ञात खात्यात वळती केली होती. सदर बाब उघड होताच या प्रकरणी बँक प्रशासनाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मानपाडा पोलिसांनी या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत हा गुन्हा ठाणे नौपाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

सहकार सोसायटीत 200 कोटींचा घोटाळा

पुण्यातील वारजे माळवाडी भागात रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीमध्ये 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी मूळ सभासद असलेल्या हक्काच्या सदनिका दुसऱ्याच लोकांना विकून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात या सोसायटीचे चेअरमन अंबादास गोटे आणि सेक्रेटरी गणेश माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पाच एकर जागेवर भटक्या विमुक्त समाजातील लोकं राहत होते. मात्र त्यावेळेस या लोकांची फसवणूक करत हे फ्लॅट परस्पर विक्री करण्यात आले. यामुळे या विरोधात लढा देणाऱ्या नागरिकांनी आम्हाला आमची घरं परत मिळावी अशी मागणी केली आहे. (Dombivli Civic Co-Operative Bank was robbed of Rs 1.5 crore by hacking the bank’s server)

इतर बातम्या

आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठींच्या निलंबनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे पाठवला

Sangli Boy Death : सांगलीत दगड घडवणाऱ्या मजुराच्या मुलाला जेसीबीने चिरडले, रस्त्याशेजारी झोपला होता शाळकरी मुलगा

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.