‘मला जीवे मारण्याची धमकी’, दीपेश म्हात्रे यांचा आरोप, डोबिंवलीत पुन्हा महायुतीत शितयुद्ध?

कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील शितयुद्ध आणि त्या शितयुद्धाचा फुटलेला फुगा फुटलेला आपण पाहिला. यानंतर आता डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटात टोकाचं शितयुद्ध रंगलेलं बघायला मिळत आहे.

'मला जीवे मारण्याची धमकी', दीपेश म्हात्रे यांचा आरोप, डोबिंवलीत पुन्हा महायुतीत शितयुद्ध?
'मला जीवे मारण्याची धमकी', दीपेश म्हात्रे यांचा आरोप
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 4:17 PM

कल्याण डोंबिवलीत महायुतीमधील धुसफूस काही केल्या कमी होताना दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी डोंबिवलीत भाजपला डिवचणारे बॅनर लावण्यात आले होते. “हॅपी बर्थ डे खड्डे”, अशा आशयाचे बॅनर डोंबिवलीत झळकले होते. त्यामुळे डोंबिवलीत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शितयुद्ध सुरु असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं होतं. विशेष म्हणजे ‘हॅपी बर्थ डे खड्डे’ अशा बॅनरची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला होता. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांना नोटीस बजावण्यात आली होती. विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जॉली प्रिंटिंग संचालकाच्या जबाबात दीपेश म्हात्रे यांचे नाव समोर आल्याने पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली होती.

यानंतर दीपेश म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात दाखल होत आपला जबाब नोंदवला होता. याच प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. दीपेश म्हात्रे यांनी आपल्याला धमकी दिली जात असल्याचा आरोप केला आहे. दीपेश म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन देत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दहशत पसरवण्याबाबत तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता हा वाद कुठपर्यंत जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“मी, डोंबिवली विधानसभेतील एका जबाबदार नागरिकाच्या नात्याने आपणास निवेदन करीत आहे की, गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली विधानसभेतील वातावरण गढूळ करण्याचे कार्य काही लोकांकडून करण्यात येत आहे. हे लोक पक्षाच्या नावाखाली दहशत पसरवून, समाजात दडपशाहीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत”, असा आरोप दीपेश म्हात्रे यांनी केला.

दीपेश म्हात्रे यांचा अतिशय गंभीर आरोप

“विशेषतः, काही दिवसांपूर्वीच संबंधित पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक स्टेटसवर “आम्हाला गणपत गायकवाड व्हायचं नाही” अशा प्रकारच्या धमकीवजा पोस्ट्स ठेवल्या होत्या. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्या स्टेटसमध्ये स्पष्टपणे लिहिले होते की, “तुमची अवस्था महेश गायकवाड यांची केली तशी करू” असे म्हणत, त्यांनी मला ठार मारण्याचा इशारा दिला आहे”, असा गंभीर आरोप दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.

“या प्रकारामुळे डोंबिवलीमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, काही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या धमक्या देऊन, समाजात अशांतता पसरवत आहेत. हा एक गंभीर गुन्हा असून, या प्रकारावर तातडीने कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, आपणास विनंती आहे की, संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. या दहशतवादी कृत्याला त्वरित थांबवणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजात शांती आणि सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित होईल. आपण या बाबतीत तातडीने कारवाई कराल, अशी माझी आशा आहे”, अशी विनंती दीपेश म्हात्रे यांनी पत्राद्वारे पोलिसांकडे केली आहे.

'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.