लग्न मंडपात ipl मॅचची स्क्रिन, मॅच पाहण्यासाठी वऱ्हाडीची मोठी गर्दी
CRIME NEWS : डोंबिवलीजवळील खोनी गावात एका लग्न समारंभात चक्क आयपीएलचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलं होतं, मॅच पाहण्यासाठी वऱ्हाडीची मोठी गर्दी झालेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे.
डोंबिवली : सोशल मीडियावर (Social Media) एखादा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) करण्यासाठी लोकं काय-काय करतात हे आपणास मोबाईल किंवा इतर माध्यमातून रोज पाहायला मिळतं. काही तरुण व्हायरल होण्यासाठी रोज नव्या आयडिया शोधून काढतात. सोशल मीडियावर आपले चांगले व्हिडीओ शेअर केल्यामुळे काही तरुण चांगलेचं चर्चेत आले आहेत. सध्या आयपीएल सुध्दा चांगलीचं रंगात आली आहे. यंदाचं आयपीएल (IPL 2023) कोण जिंकणार? यावर सुद्धा चांगलीचं चर्चा रंगू लागली आहे. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये मॅच पाहताना (IPL Viral Video) दिसत आहे. काल डोंबिवली येथील खोनी गावात लग्न समारंभात एका व्यक्तीने ipl मॅचची स्क्रिन लावली होती. तिथं आलेल्या पैपाहुण्यांनी मॅच पाहण्यासाठी मोठी सुध्दा केली होती.
लग्न मंडपात ipl मॅच स्क्रिन लावली
भारतात क्रिकेटवेड्यांची संख्या कमी नाही. आपल्याकडं लोक कुठेही कधीही क्रिकेटची मॅच पाहण्यात दंग झालेले दिसतात. मग मोबाईल असो , हॉटेल असो रस्त्याच्या कडेला एखाद्या टिव्हीच्या शोरुमबाहेरची गर्दी, घरात टिव्हीच्या समोर तासन् तास बसलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात. पण अशा क्रिकेटवेड्यांसाठी डोंबिवलीजवळील खोनी गावात एका लग्न समारंभात चक्क सामना पाहण्यासाठी लग्न मंडपात ipl मॅच स्क्रिन लावली असून मॅच पाहण्यासाठी वऱ्हाडीची मोठी गर्दी झालेल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
लोकांनी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती चांगलाचं व्हायरल झाला आहे. लोकांनी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. त्याचबरोबर काही हा व्हिडीओ आपल्या मोबाईल स्टेटला ठेवला आहे. तर काही लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडीओला कमेंट सुध्दा येत आहेत. काही लोकं म्हणत आहेत की, हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल होईल.