मुंब्य्रात दोन दिवसात 16 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, दोन आरोपी अटकेत
अटक आरोपी नदीम मेहबूब खान आणि आरोपी गोडविन इमानियल इफेनजी यांनी सदरची एमडी पावडर कोठून आणली? आणि मुंब्रा परिसरात कुणाला विकणार होते? याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.
मुंब्रा : मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा बायपास परिसरात केलेल्या दोन विविध अंमली पदार्थ विरोधी कारवायांमध्ये पोलिसांनी 210 ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत केले आहे. या एमडी ड्रग्सची बाजारातील किंमत तब्बल 16 लाख एवढी आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी सांगितले. अटक आरोपी नदीम मेहबूब खान आणि आरोपी गोडविन इमानियल इफेनजी यांनी सदरची एमडी पावडर कोठून आणली? आणि मुंब्रा परिसरात कुणाला विकणार होते? याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईत स्वतः मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्यासह पुढील अधिक तपास करीत आहेत.
शनिवारी झालेल्या कारवाईत 100 ग्रॅम ड्रग्ज हस्तगत
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 19 नोव्हेंबर रोजी पोलीस पथकाने पोलीस पथकाने मुंबा बायपास रोडवर वाय जंक्शन जवळ सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या. गोडविन इमानियल इफेनजी असे या आरोपीचे नाव असून तो नवी मुंबईतील रहिवासी आहे. त्याच्याकडून 100 ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे आणि एनडीपीएस पथकातील पोलीस हवालदार बांगर, पोलीस नाईक राजपूत, पोलीस शिपाई खैरनार पोलीस शिपाई जाधव यांचा या कारवाईत समावेश होता. गोडविन याच्याकडे सापडलेल्या ड्रगची बाजारातील किंमत ५ लाख ६ हजार इतकी आहे. त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रविवारी झालेल्या कारवाईत 110 ग्रॅम ड्रग्ज जप्त
दुसरी अंमली पदार्थाची कारवाई 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. पोलीस पथकाला खडी मशिन रोड, साहिल हॉटेलच्या मागे, मुंबा बायपास रोड एक इसम मोफेडीन (एमडी) ड्रग्स विक्री करण्यासाठी येत आहे, अशी माहिती मिळाली आहे. पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी नदीम मेहबूब खान याला जेरबंद केले. त्याच्याकडून 10 लाख रुपयांची 110 ग्रॅम मोफेड्रोन पावडर हस्तगत केली. त्याच्या विरोधातही मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता त्याला 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Drugs worth Rs 16 lakh seized in two days in Mumbai, two accused arrested)
इतर बातम्या
पतीला गुप्त रोग असल्याचा संशय, संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा पत्नीवर हत्येचा आरोप
पंढरपूरला देवदर्शन, मग बायकोच्या माहेरी, नंतर वडिलांची भेट, अखेर पती-पत्नीचा गळफास