राज ठाकरे यांच्या ‘त्या’ भूमिकेमुळे मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्याची सोशल मिडियावर भावूक पोस्ट
सौदी येथील राजवटीनेही भोंग्यांची तीव्रता कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणो वागण्यास तयार होतील. त्यामुळे पक्ष प्रमुख ठाकरे यांनी अशा प्रकारची भूमिका घेऊन समाजाला विश्वासात घेऊन या गोष्टी करता आल्या असत्या. समाजाला अंगावर घेण्याची गरज नव्हती असे शेख यांनी म्हटले आहे.
कल्याण : गुढीपाडवा मेळाव्यात शिवतिर्थावरील जाहिर सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यां (Muslim Activist)नी नाराजी व्यक्त करीत सोशल मिडियावर भावनिक पोस्ट (Emotional Post) व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसात या संदर्भात मनसेतील मुस्लीम पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन काय निर्णय घ्यायचा हे ठरविण्यात येणार आहे. मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख हे पक्षाच्या स्थापनापासून सदस्य आहेत. शेख यांनी मनसे प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. (Due to Raj Thackerays masjid role emotional post of MNS activist on social media)
काय लिहिलंय पोस्टमध्ये ?
आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या ? आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षाचा प्लॅशबॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आले, असे इरफान शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या भावनिक पोस्टविषयी शेख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पक्ष प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारु लागला आहे की, पक्षाची नेमकी भूमिका काय आहे ? पक्षात नेमके चाललंय काय ? 2009 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेतून मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांना मुस्लिम मतदारांनी मतदान केले होते.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मेहनत घेतली होती. त्यानंतर 2019 साली कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांना देखील कचोरे, नेतिवली, डायघर विभागातून मुस्लिम मतदान झाले आहे. आता मनसेतील मुस्लिम कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची येत्या दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे असे शेख यांनी सांगितले.
समाजाला विश्वासात घेऊन या गोष्टी करता आल्या असत्या
मशिदीवरील भोंगे आणि त्यावरुन दिली जाणारी बांग यासंदर्भात विशिष्ट डेसीबल, वेळ आणि अंतराची मर्यादा न्यायालयाने ठरवून दिली आहे. ही समुपदेशन करुन करण्यात आली असती. औरंगाबाद येथे हा प्रयोग करण्यात आला आहे. सौदी येथील राजवटीनेही भोंग्यांची तीव्रता कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणो वागण्यास तयार होतील. त्यामुळे पक्ष प्रमुख ठाकरे यांनी अशा प्रकारची भूमिका घेऊन समाजाला विश्वासात घेऊन या गोष्टी करता आल्या असत्या. समाजाला अंगावर घेण्याची गरज नव्हती असे शेख यांनी म्हटले आहे.(Due to Raj Thackerays masjid role emotional post of MNS activist on social media)
इतर बातम्या
TMC Commissioner : कळवा येथील स्मशानभूमी व तरणतलावाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी
Mesta : मेस्टाच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या शाळांच्या विरोधात कारवाईची मागणी