Thane Accident : वसईत खड्ड्यात अडकली इको कार, टोचन देऊन काढावं लागलं बाहेर, पालिकेविरोधात नागरिकांचा रोष
रस्त्यावरील वाहतूक अडचणीची झाली होती. ही कार काढण्यासाठी टोचणं द्यावी लागली. तेव्हा कुठं कार निघाली. संध्याकाळी ही घटना घडली. असे अपघात या रस्त्यांवर खड्ड्यामुळं नेहमीच होत असतात.
वसई : गणेश उत्सव जवळ येत आहे. त्यामुळं प्रशासन (Administration) कामाला लागलं आहे. रस्त्यांवरील खड्डे बुडविण्याचं काम जोरात सुरू आहे. पण, थिगळं इतकी पडलीत की, किती आणि कसे बुजवायचे असा प्रश्न पडलाय. अशातच खड्ड्यांमुळं (Pits) पाठदुखीचे त्रास वाढायला लागले आहे. ही सर्वसामान्य बाब झाली. वसईत चक्क खड्ड्यात इको कार (Eco car) अडकली आहे. धक्का व टोचून देऊन कारला बाहेर काढावं लागलं आहे. वसई पूर्व वालीव फाटा मुख्य रस्त्यावर आज सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशा घटनांमुळे नागरिकांनी मात्र पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कुठं कुठं आहेत खड्डे
वसई विरार नालासोपाऱ्यात गणेशोत्सव पूर्वी सर्व खड्डे बुजविल्या जातील, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. खड्डे बुजविण्याचे कामही सुरू आहे. मात्र केवळ थातुरमातुर कुठे पेव्हर ब्लॉक, कुठे डांबर टाकून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. वसई पूर्व वालीव, वालीव नाका, नवजीवन, गावराई पाडा, सातीवली, भोयदापाडा, एव्हरशाईन, नालासोपारा पूर्व धणीवबाग, बिलालपाडा, संतोषभूवन, विरार पूर्व जीवदानी रोड, विरार ते विरार फाटा रोड, नारंगी, साईनाथ या सर्वच परिसरात आजही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. दिवसागणिक अपघात होत आहेत. जीव जात आहेत तरीही पालिका प्रशासन निद्रिस्थ असल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे. खड्ड्यात इको कार अडकली. ती बाहेर काढता येत नव्हती. त्यामुळं पंचाईत झाली. रस्त्यावरील वाहतूक अडचणीची झाली होती. ही कार काढण्यासाठी टोचणं द्यावी लागली. तेव्हा कुठं कार निघाली. संध्याकाळी ही घटना घडली. असे अपघात या रस्त्यांवर खड्ड्यामुळं नेहमीच होत असतात.
खड्डे बुजविण्यासाठी 60 कोटींची तरतूद
वसई महापालिका खड्डे बुजविण्यासाठी मोठी तरतूद करते. यंदातर 60 कोटी रुपये केवळ खड्डे बुजविण्यासाठी तरतूद केली आहे. पण, तक्रार करूनही खड्डे बुजविले जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. रस्त्यात पडलेल्या खड्ड्ड्यांमुळे एका महिलेला महिनाभरापूर्वी जीव गमवावा लागला. वसईच्या गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये या महिलेचा मृत्यू झाला. आशा डमडेरे या मुलीसोबत होंडा एक्टिव्हा घेऊन जात होत्या. खड्डड्यांमुळं अपघात होऊन खाली पडल्या. हेल्मेट नसल्यानं त्यांच्या डोक्याला लागलं. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला महिना झाला. परंतु, अद्याप पालिकेला जाग आल्याचं दिसत नाही.