Dombivali Crime : घर सोडण्यास नकार दिल्याने वृद्ध आई वडिलांना मारहाण, सुसंस्कृत डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

डोंबिवली पश्चिमेतील ठाकूर वाडी परिसरात चंद्रकांत ठाकूर हे आपली पत्नी कमल ठाकूर, मुलगा चेतन ठाकूर व सून शिल्पा ठाकूर यांच्यासोबत राहतात. काही महिन्यांपासून त्यांचा मुलगा चेतन व सून शिल्पा हे या दोघांना घराबाहेर जाण्यासाठी त्रास देत आहेत.

Dombivali Crime : घर सोडण्यास नकार दिल्याने वृद्ध आई वडिलांना मारहाण, सुसंस्कृत डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 4:37 PM

डोंबिवली : संपत्तीच्या हव्यासापोटी मुलगा आणि सून वारंवार आई वडिलांकडे घर सोडण्यासाठी तगादा लावत होते. मात्र आजारी आई वडिल घर सोडण्यास नकार देत होते. यामुळे संतापलेल्या मुलगा व सुनेने वृद्ध आई वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणाचा तपास डोंबिवली विष्णुनगर पोलीस करत आहेत.

आई-वडिल घरातून जात नव्हते म्हणून मारहाण

डोंबिवली पश्चिमेतील ठाकूर वाडी परिसरात चंद्रकांत ठाकूर हे आपली पत्नी कमल ठाकूर, मुलगा चेतन ठाकूर व सून शिल्पा ठाकूर यांच्यासोबत राहतात. कमल ठाकूर या किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चंद्रकांत ठाकूर यांच्या मालकीची अन्य घरे भाड्याने देण्यात आली असून त्याचे सुमारे 60 हजार रुपये भाडे येते. काही महिन्यांपासून त्यांचा मुलगा चेतन व सून शिल्पा हे या दोघांना घराबाहेर जाण्यासाठी त्रास देत आहेत. काल चेतन व त्यांच्या पत्नीने कहर केला. चंद्रकांत व त्यांची पत्नी कमल यांना चेतन व शिल्पा यांनी शनिवारी रात्री मारहाण केली. या मारहाणीत चंद्रकांत यांच्या हाताला दुखापत झाली आहे तर कमल यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. चंद्रकांत ठाकूर आणि कमल ठाकूर यांच्यावर डोंबिवलीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलगा व सोने दोघेही सुशिक्षित बेकार

पीडितांचा मुलगा व सून दोघेही सुशिक्षित आहेत. सून गृहिणी आहे असून मुलगाही काहीच कामधंदा करीत नाहीत. दोघेही स्वतः काही कमावत नसून आई-वडिलांच्या प्रॉपर्टी व पैशावर डोळा ठेवून आहेत. आई-वडिलांना बाहेर काढून सर्व प्रॉपर्टी त्यांना बळकावयची आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून ते आई-वडिलांचा अमानुष छळ करीत आहेत. मात्र आई-वडिल आपले घर सोडण्यास तयार नाहीत. त्यात आई किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने तिच्या आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. यामुळे संतपालेल्या मुलगा व सूनेने अखेर क्रूरतेची सीमा पार केली. आई-वडिलांना जबर मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी पीडित आई वडिलांच्या तक्रारीनुसार पोलीस जबाब नोंदवत आहेत. मारहाण करणाऱ्या मुलगा आणि सुनेविरोधात ठोस कारवाई केली जाईल असे विष्णु नगर पोलिसांनी सांगितले. (Elderly parents beaten for refusing to leave home in Dombivali)

इतर बातम्या

Kalyan Crime : पत्नी व मुलावर हल्ला करुन पित्याची आत्महत्या; नेमकं काय घडलं ज्याने कल्याण हादरलं, वाचा सविस्तर

Students Attack | दहावीच्या चौघा विद्यार्थ्यांवर शाळेबाहेर चाकूहल्ला, अल्पवयीन टोळकं पसार

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.