Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Crime : वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या, कारण अस्पष्ट, घटनेमुळे डोंबिवलीत खळबळ

विजया त्यांच्या घरी एकट्याच रहायच्या. सोमवारी सकाळी विजया यांच्या घरी घरकाम करणारी महिला काम करण्यासाठी आली तेव्हा घराला बाहेरुन कडी होती. महिलेने कडी खोलून घरात प्रवेश केला असता तिला विजया या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या.

Dombivali Crime : वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या, कारण अस्पष्ट, घटनेमुळे डोंबिवलीत खळबळ
वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 4:15 PM

डोंबिवली : घरात एकटीच असलेल्या एका 58 वर्षीय वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. या हत्येमुळे डोंबिवलीत एकच खळबळ माजली आहे. मात्र ही हत्या कुणी केली ? हत्येचे कारण काय ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. विजया बाविस्कर असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची तात्काळ टिळकनगर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळी कामवाली बाई आल्यानंतर हत्येची घटना उघडकीस

मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्व भागातील टिळकचौक परिसरात आनंद शिला ही इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर विजया बाविस्कर या 58 वर्षीय महिला भाड्याने राहत होत्या. टिळक चौक परिसरातच विजया यांच्या घराचे पुनर्विकासाचे काम सुरु असल्याने त्या या इमारतीत भाड्याने राहत होत्या. विजया यांना तीन बहिणी असून त्या आपल्या कुटुंबासोबत वेगळ्या राहतात. विजया त्यांच्या घरी एकट्याच रहायच्या. सोमवारी सकाळी विजया यांच्या घरी घरकाम करणारी महिला काम करण्यासाठी आली तेव्हा घराला बाहेरुन कडी होती. महिलेने कडी खोलून घरात प्रवेश केला असता तिला विजया या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या. विजया यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर टिळक नगर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली.

पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत

घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच कल्याण क्राईम ब्रांच पथकही दाखल झाले. टिळक नगर पोलीस आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी घटनास्थळाची पाहणी केली. विजया यांची हत्या रविवारी संध्याकाळी झाली असावी असा पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. विजया यांना रविवारी संध्याकाळी कुणी भेटायला आलं होतं का? किंवा कुणी फोन केला होता का ? याबाबत पोलीस तपास करीत आहे. इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासात आहेत. पोलीस तपासानंतरच विजया यांची हत्या कुणी आणि कोणत्या उद्देशाने केली हे स्पष्ट होईल. (Elderly woman strangled to death in Dombivali, The motive for the killing is unclear)

इतर बातम्या

Pimpri Chinchwad cyber crime| पुण्यात उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत लाखांना गंडवले

देह व्यापाराची हौस महागात, टॅक्सी-निरोधाच्या नावाखाली दीड लाख उकळले, मुंबईकर तरुणाला गंडा

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.