Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीत स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीत भडका उडाल्याने कर्मचारी जखमी

डोंबिवलीतील पाथर्ली स्मशानभूमीत एका वृ्द्ध महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला होता. महिलेचा मृतदेह शववाहिनीमध्ये टाकताच शववाहिनीतील गॅसचा भडका उडाला.

डोंबिवलीत स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीत भडका उडाल्याने कर्मचारी जखमी
डोंबिवलीत स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीत भडका उडाल्याने कर्मचारी जखमी
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 7:17 PM

डोंबिवली : मृतदेहाचे अंत्यसंस्कार करताना स्मशानभूमीतील शवदाहिनीमध्ये गॅसचा भडका उडाल्याने स्मशानभूमीतील एक कर्मचारी जखमी झाल्याची दुर्दैवी डोंबिवलीत घडली आहे. गोपाळ अडसूळ असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे.

अडसूळ यांचा चेहरा भाजला

डोंबिवलीतील पाथर्ली स्मशानभूमीत एका वृ्द्ध महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला होता. महिलेचा मृतदेह शवदाहिनीमध्ये टाकताच शववाहिनीतील गॅसचा भडका उडाला. या भडक्यात कंत्राटी कर्मचारी असलेले गोपाळ अडसूळ यांचा चेहरा भाजला. या घटनेनंतर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ माजली. यावेळी महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी वंचित आघाडीचे पदाधिकारी सुरेंद्र ठोके हे देखील तेथे उपस्थित होते. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिनीसाठी 108 वर कॉल केला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना 100 नंबरवरही कॉल केला. मात्र पाऊण तास झाला तरी ना रुग्णवाहिका आली ना पोलीस आले. अखेर जखमी गोपाळ यांना घेऊन शास्त्रीनगर रुग्णालय गाठले.

महापालिकेचा गलथान कारभार उघडकीस

शास्त्रीनगर रुग्णालयात गेल्यानंतर तेथे उपचारासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यासाठी सुमारे दीड तासांनंतर पोलीस तेथे पोहोचले. याबाबत ठोके यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनाही कळविले. मात्र अधिकाऱ्यांनी हतबलता स्पष्ट केली. अडसूळ यांच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या प्रकारानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान शवदाहिनेत भडका कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे.

अनेक वर्ष जुनी आहे पाथर्ली स्मशानभूमी

पाथर्डी स्मशानभूमी अनेक वर्ष जुनी आहे. गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी शवदाहिनी आहे. पाथर्ली स्मशानभूमीत नक्की कोणत्या कारणामुळे आगीचा भडका उडाला याचा शोध घेण्यात येईल. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात एकूण 12 स्मशानभूमी आहेत. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने दररोज 7 ते 8 अंत्यसंस्कार होत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात शवदाहिनी उपयोग होत असल्याने अनेक शवदाहिनी तांत्रिक बिघाड आल्याने बंद पडल्या होत्या. महापालिका प्रशासनाकडून सर्व शवदाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. (Employees injured in gas explosion at Dombivali cemetery)

इतर बातम्या

पतीला गुप्त रोग असल्याचा संशय, संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा पत्नीवर हत्येचा आरोप

मुंबईत अभिनेत्याची पत्नी हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत, बड्या उद्योगपतींकडून कोट्यवधी उकळले

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.