Ulhas River : अखेर उल्हास नदी जलपर्णीमुक्त झाली, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून पाहणी

ड्रोनच्या माध्यमातून जलपर्णीवर औषध फवारणी केली जात होती. याचाच परिणाम म्हणून जलपर्णी हळूहळू नाहीशी होऊन यंदाच्या वर्षी तर जलपर्णी पूर्णपणे गायब झाली. याच स्वच्छ नदीची पाहणी करण्यासाठी आज ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उल्हास नदीला भेट दिली.

Ulhas River : अखेर उल्हास नदी जलपर्णीमुक्त झाली, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून पाहणी
अखेर उल्हास नदी जलपर्णीमुक्त झाली
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 8:28 PM

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी उल्हास नदी (Ulhas River) अखेर जलपर्णीमुक्त झाली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी आज या नदीची पाहणी केली. पश्चिम घाटातून उगम पावणारी उल्हास नदी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहते. या नदीतून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून या नदीवर मोठ्या प्रमाणात जलपर्णीचं आच्छादन पाहायला मिळत होतं. जलपर्णीमुळे नदीतील पाण्यातला ऑक्सिजन कमी होणं, जलचरांना खाद्य न मिळणं या समस्या उद्भवू लागल्यानं ही नदी मृत होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळं गेल्या वर्षभरापासून शासनाच्या आर्थिक मदतीतून नेरळच्या सगुणा रुरल फाउंडेशनच्या माध्यमातून ही जलपर्णी हटवण्यासाठी उपयोजना केल्या जात होत्या. (Eventually the river Ulhas became water hyacinth free, Inspection by Collector Rajesh Narvekar)

ड्रोनच्या माध्यमातून जलपर्णीवर औषध फवारणी

ड्रोनच्या माध्यमातून जलपर्णीवर औषध फवारणी केली जात होती. याचाच परिणाम म्हणून जलपर्णी हळूहळू नाहीशी होऊन यंदाच्या वर्षी तर जलपर्णी पूर्णपणे गायब झाली. याच स्वच्छ नदीची पाहणी करण्यासाठी आज ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उल्हास नदीला भेट दिली. सगुणा रुरल फाउंडेशनचे चंद्रशेखर भडसावळे यांच्यासह बोटीत बसून त्यांनी उल्हास नदीची सैर केली. यानंतर उल्हास नदी ही आधीपेक्षा लक्षणीय स्वरूपात स्वच्छ झाली असून पाण्याचा तळ दिसत असल्याचं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. तसंच नदीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी सुरुवातीला जलपर्णी हटवण्यात येत असून भविष्यात अन्य मार्गांनी होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राजेश नार्वेकर यांनी सांगितलं.

वाहत्या पाण्याचा हा पहिलाच प्रयोग

सगुणा रुरल फाउंडेशनकडून जलपर्णी मारण्यासाठी नदीत केमिकल फवारण्यात आलं असून त्यामुळे नदीतली जीवसृष्टी किंवा जलचर, पाणी यांच्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सगुणा रुरल फाउंडेशनचे प्रमुख चंद्रशेखर भडसावळे यांनी सांगितलं. तसंच यापूर्वी औरंगाबादमध्ये एका जलाशयात हा प्रयोग यशस्वी झाला असून वाहत्या पाण्यात हा पहिलाच प्रयोग असल्याचं ते म्हणाले. दरवर्षी ही फवारणी करावी लागेल का? हे मात्र अभ्यासानंतरच कळेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास आणि वालधुनी नदीत गेल्या काही वर्षात प्रचंड प्रदूषण होत होतं. आता उल्हास नदी जलपर्णीमुक्त केल्यानंतर भविष्यात नाल्याचं स्वरूप आलेल्या वालधुनी नदीचं पुनरुज्जीविकरण करण्याचा मानस सगुणा रुरल फाउंडेशनकडून व्यक्त करण्यात आला. (Eventually the river Ulhas became water hyacinth free, Inspection by Collector Rajesh Narvekar)

इतर बातम्या

अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप

VIDEO | सारं सुरळीत असताना नियती वाईट वागली, विजू मानेंनी काळजाला हात घातला, कविता ऐकतानाच एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर

Non Stop LIVE Update
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?.
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?.
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके.
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?.
धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड
धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड.
'त्या' ऑडिओ क्लीपमधील आवाज सुप्रिया आणि पटोले यांचा, अजितदादांचा आरोप
'त्या' ऑडिओ क्लीपमधील आवाज सुप्रिया आणि पटोले यांचा, अजितदादांचा आरोप.
बारामतीत दादांच्या कार्यकर्त्यांची धमकी ? काय म्हणाल्या शर्मिला पवार
बारामतीत दादांच्या कार्यकर्त्यांची धमकी ? काय म्हणाल्या शर्मिला पवार.
युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर; दादांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्या
युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर; दादांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्या.
'तुझा मर्डर फिक्स...',कांदेंची भुजबळांना उघड धमकी, हायव्होल्टेज ड्रामा
'तुझा मर्डर फिक्स...',कांदेंची भुजबळांना उघड धमकी, हायव्होल्टेज ड्रामा.
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्...
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्....