Kalyan Fake Note : कल्याणमध्ये बनावट नोटा छापणारे रॅकेट उद्धवस्त, झटपट श्रीमंत होण्यासाठी निवडला चुकीचा मार्ग

कल्याण पश्चिमेच्या एसटी स्टॅन्ड परिसरात नोटा वटवण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतलं आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 25 हजार रुपयांच्या 200, 100 आणि 50 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. तर एक मोबाईल आणि मोटारसायकल असा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.

Kalyan Fake Note : कल्याणमध्ये बनावट नोटा छापणारे रॅकेट उद्धवस्त, झटपट श्रीमंत होण्यासाठी निवडला चुकीचा मार्ग
कल्याणमध्ये बनावट नोटा छापणारे रॅकेट उद्धवस्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 11:00 PM

कल्याण : कल्याणमध्ये एका अकाउंटनेच खोट्या नोटा (Notes) छापून बाजारात वटवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने निवडलेला हा मार्ग त्याला थेट तुरुंगात घेऊन गेला आहे. रजनीश कुमार चौधरी (Rajnish Kumar Chaudhari) असं या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव असून तो अवघ्या 19 वर्षांचा आहे. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या रजनीश कुमार याने झटपट श्रीमंत होण्यासाठी घरी असलेल्या प्रिंटरवर 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा छापल्या. या नोटा तो स्वतः बाजारात वटवायचा, शिवाय हर्षद नौशाद खान आणि अर्जुन कुशवाह या त्याच्या दोन मित्रांनाही टक्केवारी देत त्यांना या नोटा वटवायला सांगायचा. (Fake note racket destroyed in Kalyan, Three accussed arrested)

पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतलं

अशाच प्रकारे हे तिघे 3 मे रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास कल्याण पश्चिमेच्या एसटी स्टॅन्ड परिसरात नोटा वटवण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतलं आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 25 हजार रुपयांच्या 200, 100 आणि 50 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. तर एक मोबाईल आणि मोटारसायकल असा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्याविरोधात आयपीसी 489 ब, 489 क आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान रजनीश कुमार याच्या घरून आणखी काही रकमेच्या बनावट नोटा, प्रिंटर, कागद आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. कल्याण स्टेशन परिसरातले टपरीचालक, फेरीवाले, रिक्षाचालक यांच्याकडे हे या नोटा गेल्या काही दिवसांपासून वटवत होते. मात्र त्यांचा संशय आल्यानं याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकताच हे नकली नोटांचं रॅकेट उघड झालं. (Fake note racket destroyed in Kalyan, Three accussed arrested)

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.