Kalyan Crime : पत्नी व मुलावर हल्ला करुन पित्याची आत्महत्या; नेमकं काय घडलं ज्याने कल्याण हादरलं, वाचा सविस्तर

मयत प्रमोद बनोरिया हे सेवानिवृत्त मोटरमन आहेत. कौटुंबिक वादातून प्रमोद यांनी पत्नी आणि मुलाला जखमी केले आणि नंतर स्वतःला संपवले, असे प्रमोद यांचा मुलगा लोकेशने पोलिसांना सांगितले. ही घटना रात्री घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

Kalyan Crime : पत्नी व मुलावर हल्ला करुन पित्याची आत्महत्या; नेमकं काय घडलं ज्याने कल्याण हादरलं, वाचा सविस्तर
पत्नी व मुलावर हल्ला करुन पित्याची आत्महत्या
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 4:13 PM

कल्याण : कल्याणमधील एका हायप्रोफाईल सोसायटीत एका 55 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रमोद बनोरिया असे मयत व्यक्तीचे नाव असून त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. कुसुम बनोरिया असे पत्नीचे तर लोकेश बनोरिया असे मुलाचे नाव आहे. जखमी पत्नी व मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात निखिल हाईट्स ही हाय प्रोफाइल सोसायटी आहे. या सोसायटीत बनोरिया कुटुंब चौथ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. मयत प्रमोद बनोरिया हे सेवानिवृत्त मोटरमन आहेत. कौटुंबिक वादातून प्रमोद यांनी पत्नी आणि मुलाला जखमी केले आणि नंतर स्वतःला संपवले, असे प्रमोद यांचा मुलगा लोकेशने पोलिसांना सांगितले. ही घटना रात्री घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

सोसायटीच्या वॉचमनमुळे घटना उघडकीस

लोकेश याने आज सकाळी सोसायटीच्या वाटमनला फोन करुन अॅम्बुलन्स पाहिजे असे सांगितले. मात्र वॉचमनला संशय आल्याने त्याने ही बाब सोसायटीतील इतर सदस्यांना सांगितली. सोसायटीतील लोकांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला. सोसायटीवाल्यांनी तात्काळ महात्मा फुले पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी घरात प्रवेश केला एक तरुण जखमी अवस्थेत पडलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता एक महिलाही जखमी अवस्थेत दिसली तर दुसरीकडे एका इसमाचा मृतदेह पडलेला होता. घरात सर्वत्र रक्त पसरलेले होते.

कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज

पोलिसांनी जखमी मुलाकडे चौकशी केली असता, वडिलांनी आम्हाला जखमी केलं त्यानंतर स्वतःला संपवलं, अशी माहिती त्याने दिली. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ आणि एसीपी उमेश माने पाटील घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तपासाअंती या प्रकरणातील तथ्य व काय घटना घडली हे समोर येईल. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल असं एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितले. (Father commits suicide by attacking wife and son in high profile society in Kalyan)

इतर बातम्या

Students Attack | दहावीच्या चौघा विद्यार्थ्यांवर शाळेबाहेर चाकूहल्ला, अल्पवयीन टोळकं पसार

लग्नावरुन परतणाऱ्या सरपंच-पोलिसावर अंदाधुंद गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.