कल्याण-दिवा येथे रस्ते अपघातात तरुण ठार; कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मनसे आमदाराची मागणी
कल्याण-दिवा-आगासन रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा.
ठाणे: कल्याण-दिवा-आगासन रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दिवा-आगासन रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. साधरणत: दीड किलोमीटरच्या रस्त्याचे काम दोन वर्षांपासून सुरू असून हे काम संपतानाच दिसत नाही. हा रस्ता पूर्ण करण्यात कंत्राटदार आणि महापालिकेचे अधिकारी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.
सुरक्षा विषयक उपाययोजनाही नव्हत्या
7 डिसेंबर रोजी या रस्त्यावर मयूर धानसई या तरुणाचा अपघात होऊन मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कंत्राटदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी रस्त्याचे काम लवकर मार्गी न लावल्याने रस्ते अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. रस्त्याचे काम सुरु असताना कंत्राटदाराने सुरक्षा विषयक उपाययोजना केल्या नव्हत्या. त्याची खबरदारीही घेतली नाही. ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीर पार्किंग
काही दिवसापूर्वी आमदार पाटील यांनी दिवा परिसरातील विकास कामांचा पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी रस्त्याचे काम लवकर मार्गी लावा, काम सुरू असताना सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळा अशा सूचना केल्या होत्या. त्यांच्या सूचनेकडे कंत्राटदार आणि अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल. त्यामुळेच एका तरुणाला जीव गमाविण्याची वेळ आली. वास्तविक पाहता हा रस्ता महत्वाचा आहे. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर करणो आवश्यक होते. मात्र अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या नाकर्तेपणामुळे हे काम संथ गतीने सुरू आहे. तसेच रस्त्याचे काम सुरु असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसतात. त्याचबरोबर गाड्यांचे बेकायदेशीर पार्किग केले जाते. तरुणाच्या अपघात प्रकरणी केवळ वाहन चालकावर गुन्हा दाखल करून चालणार नाही. तर त्याला जबाबदार असलेले कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.
Video : Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 8 December 2021 https://t.co/gdP6IRSQFa @OfficeofUT @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra #Headlines #FastNews #MahafastNews #SuperFastNews #Tv9Marathi #DistrictNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2021
संबंधित बातम्या:
Ajit Pawar : ओबीसी आरक्षणावर संकट, अनेक नेते म्हणतात निवडणुकाच नको, आता अजित पवारांचं रोखठोक मत
Omicron : दिलासादायक! राज्यातल्या पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाला डिस्चार्ज, आयुक्त म्हणाले…