Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Crime: चाकूचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या पाच जणांना अटक, डोंबिवली रामनगर पोलिसांची कारवाई

मुंबईतील एका खाजगी बँकेत कामाला असलेले संतोषकुमार शर्मा हे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील चामुंडा गार्डनमध्ये राहतात. 25 डिसेंबरच्या मध्य रात्री 1 वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान संतोष कुमार रस्त्याने घरी जात असताना मास्क परिधान केलेल्या पाच तरुणांनी त्यांचा पाठलाग केला.

Dombivali Crime: चाकूचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या पाच जणांना अटक, डोंबिवली रामनगर पोलिसांची कारवाई
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 4:48 PM

डोंबिवली : चाकूचा धाक दाखवित पाच जणांनी एका बँक कर्मचाऱ्याला लुटण्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील ठाकूर्ली परिसरात 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले होते. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पाच जणांना सापळा रचत अटक केली आहे. आशु दुमडा, कुणाल बोध, विशाल जेठा, सलमान पुहाल, गणेश लोट अशी या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी पाठलाग करुन बँक कर्मचाऱ्याला लुटले

मुंबईतील एका खाजगी बँकेत कामाला असलेले संतोषकुमार शर्मा हे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील चामुंडा गार्डनमध्ये राहतात. 25 डिसेंबरच्या मध्य रात्री 1 वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान संतोष कुमार रस्त्याने घरी जात असताना मास्क परिधान केलेल्या पाच तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. या चोरट्यांनी संतोष कुमारला घेरले. त्याच्या गळ्यावर चाकू लावून त्यांच्याकडील दोन लॅपटॉप, महागडा मोबाईल एटीएम आदी सर्व घेऊन पसार झाले.

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना केले अटक

या याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. घटनेनंतर आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले. हे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे रामनगर पोलिसांनी त्रिमुर्तीनगर वसाहतीमधील वाल्मिक वस्तीमधील मंदिराचे पाठिमागील तबेल्याजवळ सापळा रचत या पाचही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली

या पाचही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता 30 तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान डोंबिवली ठाकुर्लीला जोडणाऱ्या 90 फिट रोड परिसरात या आधी देखील अशा घटना घडल्या असून याठिकाणी पोलीस चौकीची मागणी केली जात आहे. याबाबत या ठिकाणी पोलीस चौकीची प्रक्रिया सुरू असल्याचं एसीपीचे डी मोरे यांनी सांगितलं. (Five arrested for stabbing bank employee in dombivali)

इतर बातम्या

Nagpur Crime | शेतात गेला तो परतलाच नाही, दोन दिवसांनंतर विहिरीत मृतदेहच सापडला; शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण काय?

VIDEO | कॉफी शॉपमध्ये गुप्त जागा, अश्लील चाळे करताना प्रेमी युगुलं रंगेहाथ

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.