दसरा सण मोठा…! झेंडूला सोन्याचा भाव, कल्याण फुलबाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी
उद्याच्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आज झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यासाठी कल्याणच्या फूल बाजारात तुफान गर्दी झाली होती. (Flower prices bloom ahead of Dussehra festival)
कल्याण: उद्याच्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आज झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यासाठी कल्याणच्या फूल बाजारात तुफान गर्दी झाली होती. ही गर्दी इतकी प्रचंड होती की बैलबाजार आणि नेतिवलीपर्यंतची वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांना सकाळी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सोडावी लागली.
दसऱ्या निमित्ताने आज पहाटेच कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. फळं, झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यारसाठी ही गर्दी झाली होती. यावेळी एपीएमसी मार्केटमध्ये प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे अचानक नागरिकांची गर्दी उसळल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. अगदी मुख्य रस्त्यापर्यंत ही गर्दी आली होती. त्यामुळे नेतिवली ते बैल बाजार वाहतुकीवर परिणाम झाला होता.
सोन्याचा भाव
उद्या दसरा असल्याने नागरिकांनी झेंडूची फुलं खरेदी करण्यासाठी बाजारात एकच गर्दी केली होती. तब्बल दोन वर्षानंतर नागरिकांना उत्साहात सण साजरा करता येणार आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर बाजारात आले होते. त्यामुळे झेंडूच्या फुलांनाही चांगलाच भाव आला होता. होलसेल मार्केटमध्ये झेंडू 60 रुपये किलो, शेवंती 80 रुपये किलो, गुलाब 80 ते 120 रुपये किलो आणि दसऱ्याची माळ 50 रुपयाला विकली जात होती. रिटेलमध्ये या दरात 20 रुपयाने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिक आजच आपट्याची पानेही मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत होते.
फुलांचा भाव काय?
झेंडू – 60 किलो शेवंती -80 किलो गुलाब : 80 ते 120 दसरा माळ : 50 रुपये
दादरचा फुल बाजार गजबजला
दादरच्या फुल मार्केटमध्येही नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. फळ आणि फुले खरेदीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. उद्या असणाऱ्या दसऱ्यानिमित्त नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. अनेकांचा मार्केटमध्ये बिना मास्क वावरही पाहायला मिळत आहे. फुल बाजारातील गर्दीमुळे दादर, एलफिस्टन, लोअर परेलच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. कोरोना संपला असल्याच्या अविर्भावात लोक फिरताना दिसत आहेत.
वाशिममध्ये झेंडूला 100 रुपयांचा भाव?
सणासुदीच्या दिवसामध्ये झेंडूच्या फुलांना प्रंचंड मागणी असते. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातील झेंडू फुले तोडणीला वेग आला आहे. दोन वार्षपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या भीतीने वाशिम जिल्ह्यात यंदा झेंडूची लागवड निम्म्याहून अधिक घटली. त्यातच काही शेतकऱ्यांनी झेंडू शेती चांगली बहरली असून शेतकऱ्यांनी झेंडू फुले हैदराबाद मार्केटमध्ये नेली आहेत. त्यांना दसऱ्याला दिवशी झेंडूला प्रती किलो 100 रुपये भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 14 October 2021 https://t.co/AivafddpNC #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2021
संबंधित बातम्या:
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8984 घरांसाठी आज ऑनलाइन सोडत निघणार
अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी पैशांची मागणी; काँग्रेसच्या नगरसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
अंबरनाथमध्ये भरधाव बसची दुचाकीस्वाराला धडक; अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी
(Flower prices bloom ahead of Dussehra festival)