Ulhasnagar Crime : उल्हासनगरात जेष्ठ नागरिकांना साडेपाच कोटींचा गंडा, जास्त परताव्याचं आमिष देत केली फसवणूक

उल्हासनगरात शहरातील 37 ज्येष्ठ नागरिकांनी जानेवारी 2017 मध्ये उल्हासनगरच्या सद्गुरू डेव्हलपर्स या विकासकाकडे 5 कोटी 54 लाख रुपयांची गुंतवणूक केली. याचा मोबदला म्हणून कल्याणला नव्याने सुरू होत असलेल्या प्रकल्पात दुकानं, घरं किंवा जादा रक्कम परतावा म्हणून देण्याचं आमिष या विकासकांनी दाखवलं होतं.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात जेष्ठ नागरिकांना साडेपाच कोटींचा गंडा, जास्त परताव्याचं आमिष देत केली फसवणूक
उल्हासनगरात जेष्ठ नागरिकांना साडेपाच कोटींचा गंडा
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 9:57 PM

उल्हासनगर : बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचं आमिष दाखवत वृद्धांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचं प्रकरण उल्हासनगरात उघडकीस आलं आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी 8 बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. सुंदर बजाज, लाल बजाज, हिरासिंग आइलसिंघानी, मनमोहन आइलसिंघानी, फेरू लुल्ला, नंदलाल लुल्ला, गोविंद मनचंदा आणि ओम मनचंदा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.

जेष्ठ नागरिकांनी सद्गुरु डेव्हलपर्सकडे केली होती गुंतवणूक

उल्हासनगरात शहरातील 37 ज्येष्ठ नागरिकांनी जानेवारी 2017 मध्ये उल्हासनगरच्या सद्गुरू डेव्हलपर्स या विकासकाकडे 5 कोटी 54 लाख रुपयांची गुंतवणूक केली. याचा मोबदला म्हणून कल्याणला नव्याने सुरू होत असलेल्या प्रकल्पात दुकानं, घरं किंवा जादा रक्कम परतावा म्हणून देण्याचं आमिष या विकासकांनी दाखवलं होतं. मात्र काही कालावधीनंतर या विकासकाकडे परतावा मागितला असता तो टाळाटाळ करू लागला. तसंच त्यांनी या गुंतवणूकदारांना कुठेही दुकानं किंवा घरं सुद्धा दिली नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या 37 गुंतवणुकदारांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर 2021 रोजी सद्गुरू डेव्हपर्स विरोधात गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल करुन 22 दिवस उलटले तरी कोणालाही अटक नाही

मात्र गुन्हा दाखल होऊन 22 दिवस उलटले, तरी पोलिसांनी याप्रकरणी कोणत्याही विकासकाला अटक केलेली नाही. त्यामुळे हे सर्वजण शहरात मोकाट फिरत असल्याचा आरोप तक्रारदार किशोर दादलानी यांनी केला आहे. तसंच आम्ही सर्व निवृत्त नागरिक असून आमची आयुष्यभराची पुंजी आम्ही या गुंतवणुकीत लावली आहे. त्यामुळे आम्हाला आमचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी या वृद्ध गुंतवणूकदारांनी केली आहे. याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना विचारलं असता, आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (Fraud of senior citizens in Ulhasnagar by offering high returns)

इतर बातम्या

Pune Crime: खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात घुसायचे, अंगठ्या चोरुन पसार व्हायचे; मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी तरुणांचा फंडा

Video | Shocking | Tragedy | गळफास घेण्याची एक्टिंग करताना स्टूलवरुन पडला आणि…

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.