Badlapur Kidnapping : दहावीच्या परीक्षेला घाबरून तिनं रचला अपहरणाचा बनाव, बदलापूरची मुलगी ट्रेन पकडून पोहोचली परळला
या गुन्ह्याचा तपास बदलापूर पश्चिम पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांना तिच्या अपहरणाचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळं तिच्यावर संशय आल्यानं पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता, परीक्षेला घाबरून आपणच घरातून निघून गेलो आणि अपहरणाचा बनाव रचल्याचं तिने कबुल केलं.
बदलापूर : दहावीच्या परीक्षे (Exam)ला घाबरून एका 16 वर्षांच्या मुलीनं थेट स्वतःच्या अपहरणा (Kidnapping)चा बनाव रचल्याचा प्रकार बदलापुरात समोर आलाय. पोलिसांनी केलेल्या चौकशी (Inquiry)त तिचा हा खोटेपणा उघड झाला असून आता पोलीस तिच्यावर काय कारवाई करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुलीने अपहरणाची खोटी कहाणी घरच्यांना आणि पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याअनुषंगाने तपास सुरु केला. मात्र पोलिसांना अपहरणाबाबत कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी मुलीचीच उलटतपासणी घेतली असता परिक्षेला घाबरुन आपण हे कृत्य केल्याचे तिने कबुल केले. (Frightened by the matriculation examination, a girl from Badlapur pretended to be abducted)
परिक्षेला घाबरुन अपहरणाचा बनाव रचला
बदलापूर पश्चिमेच्या मांजर्ली परिसरात राहणारी ही 16 वर्षीय मुलगी दहावीत शिकत असून काही दिवसात तिची परीक्षा सुरू होणार आहे. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी या मुलीने घरातून बाहेर पडत ट्रेनने परळ गाठलं. तिथून घरी फोन करून आपलं अपहरण झालं असून चार जणांनी आपल्याला बेशुद्ध करत गाडीत टाकून परळला आणलं, मात्र आपण अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत पळून आल्याची कहाणी रचून घरच्यांना सांगितली. त्यावेळी घरच्यांनी आधी जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितल्याने या मुलीने दादर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.
या गुन्ह्याचा तपास बदलापूर पश्चिम पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांना तिच्या अपहरणाचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळं तिच्यावर संशय आल्यानं पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता, परीक्षेला घाबरून आपणच घरातून निघून गेलो आणि अपहरणाचा बनाव रचल्याचं तिने कबुल केलं. त्यामुळं पोलिसांनीही डोक्यावर हात मारून घेतला. या सगळ्यानंतर आता या मुलीवर काही कारवाई होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Frightened by the matriculation examination, a girl from Badlapur pretended to be abducted)
इतर बातम्या
Wardha Crime : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात झिंगाट पार्टी, आयोजकासह फार्म मालकाला अटक