Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापूरचे गणपती बाप्पा कॅनडाला रवाना!; यांच्याकडून पहिला कंटेनर पाठवला

परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जातात.

बदलापूरचे गणपती बाप्पा कॅनडाला रवाना!; यांच्याकडून पहिला कंटेनर पाठवला
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 4:33 PM

ठाणे : गणेशोत्सवाला अद्याप सहा महिने बाकी असले, तरी मूर्तिकार मात्र आत्तापासूनच तयारीला लागलेत. त्यातही परदेशात असलेल्या भारतीयांनाही बाप्पाचा पाहुणचार करता यावा, यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात. बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी सहा महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते. यंदा सर्वात आधी कॅनडा देशात गणपती बाप्पा रवाना झाले आहेत. पहिल्या खेपेत कॅनडाच्या व्हॅनकुव्हर शहरात अडीच हजार बाप्पा रवाना झाले आहेत.

GANESH 1 N

हजारो बाप्पा परदेशातील भक्तांकडे

जुलै महिन्याखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते. हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात. दरवर्षी कॅनडासह अमेरिका, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात. त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात.

हे सुद्धा वाचा

सहा वर्षांपासून गणेशमूर्ती निर्यात

निमेश जनवाड या तरुण उद्योजकाने मागील सहा वर्षांपासून गणेशमूर्ती निर्यात करायला सुरुवात केली. मसालाकिंग धनंजय दातार यांनी त्याला संधी दिली. सुरुवातीला काही शे गणेशमूर्तींची ऑर्डर दिली. २०१७ साली चिंतामणी क्रिएशन्स या व्यवसायाची सुरुवात केलेल्या निमेशने २०१८ साली ३ हजार आणि २०१९ साली साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या होत्या.

गेल्यावर्षी पाठवल्या ३५ हजार गणेशमूर्ती

२०२० साली कोरोनामुळे निर्यात बंद झाल्यानं त्याला तब्बल ४० लाख रुपयांचा फटका बसला होता. त्यानंतर २०२१ साली त्याने मोठी झेप घेत २० हजार गणेशमूर्ती निर्यात केल्या होत्या. २०२२ साली त्याने ३५ हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवत नवीन विक्रम केला होता.

यंदाच्या वर्षी त्याच्याही पुढे जात तब्बल ४५ ते ५० हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवण्याची निमेशची तयारी आहे. त्याने पाठवलेल्या गणेशमूर्तींमुळे परदेशातल्या भारतीयांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे.