मुंबई : ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणूकीत आनंद कांबळे यांची अध्यक्ष पदासाठी निवड झाली. तर टीव्ही 9 मराठीचे ठाणे प्रतिनिधी गणेश थोरात यांची पत्रकार संघाच्या सहचिटणीस पदावर निवड झाली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत आनंद कांबळे आणि दिलीप शिंदे यांना सारखीच 44 मते मिळाली, कांबळे यांची लॉटरी पद्धतीने एक वर्षासाठी निवड झाली असून पुढच्या वर्षी दिलीप शिंदे अध्यक्ष म्हणून पत्रकार संघाचा कारभार सांभाळतील असे सूत्रांनी स्पष्ट केले.
टीव्ही 9 मराठीचे ठाणे प्रतिनिधी गणेश थोरात यांना सहचिटणीस पदासाठी 77 मते मिळून त्यांची निवड झाली. कार्याध्यक्ष म्हणून विकास काटे (60 मते ), उपाध्यक्ष पदासाठी दीपक शेलार ( 42 मते ) यांची निवड झाली. सरचिटणीस पदी निलेश पानमंद यांची ( 69 मते ) निवड झाली. खजिनदार पदी विभव बिरवटकर बिनविरोध निवडून आले. सदस्यपदी युनूस खान, प्रफुल्ल गांगुर्डे,अशोक गुप्ता, सचिन देशमाने, अमर राजभर, पंकज रोडेकर तर अनुपमा गुंडे यांची बिनविरोध निवड झाली. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या निवडणूकीचे निवडणूक अधिकारी म्हणून महेश राजदरेकर, रवींद्र मांजरेकर होते.