Kalyan Wheel stuck : गटारावरील लोखंडी पत्रा खचून कचरागाडीचे चाक अडकले, एक तासानंतर जेसीबीच्या सहाय्याने गाडी काढली बाहेर

पालिकेचे कचरावाहू गाडी डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोड आणि भाजी मार्केट येथील कचरा भरून उंबार्डे डंपिंग ग्राउंडच्या दिशने जात होता. सुयोग सभागृहासमोरील रस्त्याच्यासमोर गटारावरील लोखंडी पत्रा खचून कचरावाहू गाडीचे मागचे चाक अडकले.

Kalyan Wheel stuck : गटारावरील लोखंडी पत्रा खचून कचरागाडीचे चाक अडकले, एक तासानंतर जेसीबीच्या सहाय्याने गाडी काढली बाहेर
गटारावरील लोखंडी पत्रा खचून कचरागाडीचे चाक अडकलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 10:39 PM

कल्याण : पूर्वेकडील सुयोग मंगल कार्यालयासमोरील रस्त्यामधील गटारावरील लोखंडी पत्रा खचून कचरावाहू गाडी (Garbage Truck)चे चाक अडकल्याची घटना गुरुवारीस सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. डोंबिवलीतून उंबार्डे डंपिंग ग्राउंडच्या दिशने कचरा गाडी जात असताना ही घटना घडली आहे. कचऱ्याची गाडी अडकल्यामुळे तब्बल एक तास पूर्ण परिसरात वाहतूक (Traffic) कोंडी होती. पालिकेच्या घनकचरा व्य्वस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्याने जेसीबी (JCB)च्या सहाय्याने अडकलेली गाडी बाहेर काढण्यात आली. काही दिवसांपूर्वी पूर्वेकडील स्टेशनबाहेरील रस्त्यावर ट्रकचे चाक अशा प्रकारे अडकल्याची घटना घडली होती.

काही काळ परिसरातील वाहतूक खोळंबली होती

पालिकेचे कचरावाहू गाडी डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोड आणि भाजी मार्केट येथील कचरा भरून उंबार्डे डंपिंग ग्राउंडच्या दिशने जात होता. सुयोग सभागृहासमोरील रस्त्याच्यासमोर गटारावरील लोखंडी पत्रा खचून कचरावाहू गाडीचे मागचे चाक अडकले. वाहनचालक गोकुळ आहिरे यांनी या घटनेची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. याची माहिती मिळताच कर्मचारी घटनास्थळी आले. जेसीबीच्या सहाय्याने अडकलेली गाडी बाहेर काढण्यात आली. दरम्यान या ठिकाणची वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती.

वसईत खड्ड्यात इको कार अडकली

वसईत चक्क खड्ड्यात इको कार अडकली आहे. वसई पूर्व वालीव फाटा मुख्य रस्त्यावर आज सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशा घटनांमुळे नागरिकांनी मात्र पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. वसई पूर्व वालीव, वालीव नाका, नवजीवन, गावराई पाडा, सातीवली, भोयदापाडा, एव्हरशाईन, नालासोपारा पूर्व धणीवबाग, बिलालपाडा, संतोषभुवन, विरार पूर्व जीवदानी रोड, विरार ते विरार फाटा रोड, नारंगी, साईनाथ या सर्वच परिसरात आजही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मात्र पालिका प्रशासन निद्रिस्थ असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. (Garbage truck wheel stuck in sewer in Kalyan, traffic disrupted)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.