Ulhasnagar Crime : सराईत गुंड ‘अंडापाव’ला गुजरातमधून अटक; उल्हासनगरातील अपहृत मुलीची सुखरूप सुटका

| Updated on: Jan 16, 2022 | 12:20 AM

कुख्यात गुंड अंडापाव याला मित्रांना कॉल करणे महागात पडले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बरेच दिवस त्याचा फोन बंद असल्यामुळे तो पोलिसांना गुंगारा देऊ शकला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने उल्हासनगरातील आपल्या मित्रांशी फोनवरून संपर्क साधला.

Ulhasnagar Crime : सराईत गुंड अंडापावला गुजरातमधून अटक; उल्हासनगरातील अपहृत मुलीची सुखरूप सुटका
CRIME
Follow us on

उल्हासनगर : उल्हासनगरातून दोन महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेताना सराईत गुंड पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी अपहृत अल्पवयीन मुलीचीही सुखरूप सुटका केली, त्याचवेळी ‘अंडापाव’ नावाच्या कुख्यात सराईत गुन्हेगाराच्या हातात बेड्या ठोकण्यात पोलिसांनी यश मिळवले. क्राईम ब्रँचने गुजरातमधून अपहृत मुलीची सुटका करीत गुंड ‘अंडापाव’ला अटक केली.

अपहृत मुलीची दोन महिन्यानंतर सुटका

उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे दोन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. पालकांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यापासून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. ही मुलगी ज्या भागात राहते, त्या भागातील सराईत गुंड संतोष बाबू अण्णा उर्फ अंडापाव हा देखील गायब झाला होता. त्यामुळे त्यानेच अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा संशय बळावला होता. त्याच संशयाच्या आधारे पोलीस गुंड अंडापाव याचा आणि अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेत होते. या कालावधीत आपला थांगपत्ता लागू नये म्हणून गुंड अंडापाव याने आपला फोन बंद करून ठेवला होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा माग काढता येत नव्हता.

गुंडाने मित्रांना कॉल केला आणि जाळ्यात सापडला!

कुख्यात गुंड अंडापाव याला मित्रांना कॉल करणे महागात पडले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. बरेच दिवस त्याचा फोन बंद असल्यामुळे तो पोलिसांना गुंगारा देऊ शकला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने उल्हासनगरातील आपल्या मित्रांशी फोनवरून संपर्क साधला. पोलिसांनी अंडापावच्या अटकेसाठी त्याच्या मित्रांवरही पाळत ठेवली होती. मित्रांना येणाऱ्या कॉल्सवर पोलिसांचे लक्ष होते. याच खबरदारीमुळे पोलिसांना गुंड अंडापावपर्यंत पोहोचणे शक्य झाले.

पोलिसांनी गुजरातमधील नंबरचा माग काढला

गुंड ‘अंडापाव’च्या मित्रांना गुजरातमधून कॉल येत असल्याचे समजताच पोलिसांनी गुजरातमधील त्या नंबरचा माग काढला. त्यावेळी पोलिसांना तो नंबर अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या अंडापावकडे असल्याचे आढळले. पोलीस त्या नंबरच्या साहाय्याने अंडापावपर्यंत पोहोचले, त्यावेळी त्यांना गुंड अंडापाव हा अपहृत मुलीसह आढळून आला. पोलिसांनी मुलीची सुटका केली आणि अंडापाव याला अटक करून उल्हासनगरात आणले.

गुंड ‘अंडापाव’विरुद्ध बलात्कार, खुनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे

अपहृत मुलीची सुटका केल्यानंतर पोलिसांनी ‘अंडापाव’वर बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दंगल, खुनाचा प्रयत्न, मारहाण असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांकडे सोपवण्यात आल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे. (Goon Andapav arrested from Gujarat, Safe release of abducted girl from Ulhasnagar)

इतर बातम्या

दोन वर्षे काम करायचा, विश्वास जिंकायचा आणि चोरी करून गायब व्हायचा

Beed Crime : बीडमधील ‘त्या’ जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृ्त्यू, नातेवाईकांची आरोपीच्या अटकेची मागणी