धुळवडीचे अनोखा रंग, मटण, मासळी, चिकनवर ताव, दुकानासमोर गर्दीचा रेकॉर्ड
Mutton, Chicken Shop : राज्यात सर्वत्र होळीची धामधूम सुरू आहे. रंगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. तर सलग तीन दिवस सुट्टी आल्याने अनेक जणांनी आज धुळवडीसाठी मांसाहाराचा बेत आखला आहे. मटण, चिकन दुकानावर सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे.

राज्यात सर्वत्र होळीची धूम आहे. सर्वत्र रंगाची उधळण होत आहे. रंगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. तर सलग तीन दिवस सुट्टी आल्याने अनेक जणांनी आज धुळवडीसाठी मांसाहाराचा बेत आखला आहे. मटण, चिकन दुकानावर सकाळपासूनच झुंबड उडाली आहे. सकाळपासूनच या दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी उसळल्याचे दिसून येत आहे. सकाळपासूनच ही दुकानं उघडल्याचे तर काहींनी अगोदरच ऑर्डर बुक केल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. धुळवडीला मांसाहारावर ताव मारण्याचा अनेकांचा बेत आहे. त्यासाठीच ही गर्दी झाली आहे.
चिकन-मटण खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी
राज्यात सर्वत्र धुळवडीची धामधुम सुरू आहे. पुण्यात धुळवडीमुळे चिकन आणि मटणाच्या दुकानात मोठी गर्दी जमा झाली आहे. मटण प्रेमी मार्केटमध्ये चिकन आणि मटण खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने रांगेत उभे आहेत. धुळवडीच्या दिवशी मटण खाण्याची परंपरा असल्याने अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.




तर पिंपरी चिंचवडमध्ये पण मटण-चिकन दुकानांवर ग्राहकांनी सकाळीच हजेरी लावली आहे. धुळवड म्हटलं की हमखास मांसाहार आला, सुट्टीचा दिवस आणि धुळवड ची सांगड घालून अनेक जण मांसाहाराचा बेत आखतात. पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसिद्ध मटण दुकानासमोर मटण खरेदीसाठी गर्दी झाली आहे.
ठाण्यातही मटण दुकानांसमोर मोठी गर्दी
ठाण्यात मटण दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे, कारण धूलिवंदन शुक्रवारी आल्यामुळे मटण आणि चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे, ज्यामुळे दुकानाबाहेर लोकांच्या रांगा दिसत आहेत. ठाण्यातील नौपाडा परिसरात सकाळ पासूनच ही लाभच लांब रांगा पहायला मिळत आहे. मटणाच्या दुकानांवर जास्त गर्दी असण्याच कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी कोंबड्यांना झालेली बर्ड फ्लू ची लागण आहे. त्यामुळे मटण खरेदीसाठी मोठी गर्दी उसळल्याचे दिसून येते आहे.
मरीन ड्राईव्हवर उत्साह
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात पहाटेपासूनच धुळवडीचा रंगतदार उत्सव साजरा होत आहे. तरुण-तरुणी सह सर्वच वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन एकमेकांना रंग लावत आहेत. रस्त्यापासून मुंबईचा गल्लीबोळ्या देखील धुळवड चा उत्साह मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत आहे. मोठा जोश उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. तर मरीन ड्राईव्ह परिसरात सकाळी सहा वाजल्यापासून अनेक नागरिक एकामेकांना रंग लावत उत्साह साजरा करत आहेत.